दगाबाजीचा अंत चांगला होत नाही: संजय राऊत
आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला
मुख्यमंत्रीच्या राजीनाम्यानंतर खासदार संजय राऊत यांचं ट्वीट
मुंबई : महाराष्ट्रात मोठे राजकीय भुंकप घडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, न्यायदेवतेला सन्मान होईल. फायर टेस्ट, ही अग्निपरीक्षेची वेळ आहे. हे दिवस पण निघून जाईल.
➡️ दगाबाजीचा अंत चांगला होत नाही: संजय राऊत
संजय राऊत ट्वीट करून म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री अत्यंत ग्रेसफुली पायउतार झाले. आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे, असं ते म्हणाले आहेत. बंडखोर आमदारांना उद्देशून ते म्हणाले आहेत की, दगाबाजीचा अंत चांगला होत नाही, असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखिल जिंकेल. भव्य विजयाची ही सुरुवात आहे, लाठ्या खाऊ, तुरुंगात जाऊ, पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ.
त्यांनी आणखी एक ट्वीट करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आभार मानले आहेत. ते ट्वीट करून लिहिलं आहे की, ''मी शरद पवार यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले. मार्गदर्शन केलं. स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली. सत्ता येते सत्ता जाते.''
Maharashtra Government Collapse: Fraud does not end well: Sanjay Raut, you have lost a sensitive and cultured CM Udhav Thakrey
बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.