केंद्रीय मंत्री नारायण राणेंची NCP अध्यक्ष शरद पवारांना धमकी, आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणं कठीण होईल Union Minister Narayan Rane threatens NCP president Sharad Pawar, If even the hair of the MLA is shaken, it will be difficult to reach home

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची NCP अध्यक्ष शरद पवारांना धमकी, 

आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणं कठीण होईल

मुंबई, 23 जुन: आज काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आमदारांनी मुंबईत येऊद्या, त्यातले अनेक आमदार एकनाथ शिंदेंचा पाठिंबा काढून घेतील. तसेच आम्ही बहुमत सिद्ध करू असा दावा केला. तसेच त्यांना मुंबईत तरी यावं लागेलं, असेही विधान केलं. मात्र त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवारांनाच धमकी दिली आहे. “माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.” अशी थेट धमकी त्यांनी पवारांना दिली आहे. 

 ➡️ केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांचा ट्वीट

Union Minister Narayan Rane threatens NCP president Sharad Pawar.

If even the hair of the MLA is shaken, it will be difficult to reach home.