चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरणदिनी वृक्षारोपण Tree planting on Environment Day by Chandrapur Municipal Corporation

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरणदिनी वृक्षारोपण

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर ५ जुन : जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ५ जुन रोजी वृक्षारोपण करण्यात आले. बाबुपेठ येथील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम येथे महानगरपालिका उद्यान विभागातर्फे विविध प्रजातींच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. 
आयुक्त राजेश मोहीते यांच्या मार्गदर्शनात उद्यान निरीक्षक अनुप ताटेवार, अक्षय वडपल्लीवार, संदीप रायपुरे, योगेश पेटले, गितेश मुसनवार यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी परीसरातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. परीसरातील नागरीकांनी या रोपट्यांची लागवड करण्यास मदत तर केलीच शिवाय त्यांची निगा राखण्याची तयारीही दर्शविली.  

Tree planting on Environment Day by Chandrapur Municipal Corporation.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करे.