मुंबई: सर्वोच्च न्यायालयाचा (supreme court) निर्णय ठाकरे सरकारच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे उद्याच ठाकरे सरकारला (thackeray government) विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावं लागणार आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर ठाकरे सरकार आता उद्या बहुमत सिद्ध करणार की मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे मुख्यप्रतोद सुनील प्रभू (sunil prabhu) यांनी कोर्टात याचिका दाखल करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्यास ठाकरे सरकारला सांगितलं आहे. राज्यपालांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती प्रभू यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यावर कोर्टात सुनावणी झाली असता ठाकरे सरकारच्या विरोधात निकाल गेला. परिणामी सरकारला बहुमत सिद्ध करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhi यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांचे आभार मानले. त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही शिवसेनेचे केवळ चारच मंत्री उपस्थित होतो, अशा शब्दात खंत व्यक्त केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे. शेवटी तो न्यायादेवतेचा निकाल आहे, असं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आतापर्यंतची वाटचाल तुमच्या सहकार्याने चांगली झाली. सरकार म्हणून काय केलं? सुरुवातच आपण रायगडला निधी देऊन सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. आता पीक विमा योजनेचे बीड पॅर्टनही करू घेतले. या सर्व धबडग्यात तुम्ही विसरणार नाही पण काही गोष्टा बाजूला पडतात म्हणून सांगतो. आज आयुष्य सार्थकी लागलं अशी भावना आहे. कारण औरंगाबादला संभाजीनगर नाव दिलं, उस्मानाबादला धाराशीव दिले. ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो. मी मुख्यमंत्री आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना भुखंड देण्याचं मान्य केलं. एखादी गोष्ट चांगली चालली की त्याला दृष्ट लागते. कुणाची ते तुम्हाला माहीत आहे.
मला पवार साहेब आणि सोनियाजी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खास धन्यवाद द्यायचे आहेत. नामांतराचं सांगितलं. खेद एका गोष्टीचं वाटलं. या ठरावाच्या वेळी मी आदित्य सुभाष देसाई आणि अनिल परब चारच शिवसेनेचे मंत्री होते. बाकी सगळे मंत्री… तुम्ही जाणता. हा ठराव मांडल्यानंतर काँग्रेस असो की राष्ट्रवादीने एका अक्षराने विरोध केला नाही. तातडीने मंजुरी दिली. त्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांनी करून घ्ययाचं होतं ते नामानिराळे राहिले. दूर राहिले. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं गेलं ते सोबत राहिले.
मी तुमच्याशी मनापासून बोलतोय. शिवसेनेला 56 वर्ष झाली. मी लहानपणापासून मी शिवसेना पाहतोय. रिक्षावाले, टपरीवाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल हातभट्टी वाले, त्यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. त्यांना नगरसेवक आमदार खासदार मंत्री बनवलं. मोठी झाली माणसं. मोठी झाल्यानंतर ज्यांना मोठं केलं ते विसरायला लागली. ज्यांना मोठं केलं त्यांना सत्ता आल्यानंतर जे काही देता येईल ते शक्य होतं ते दिलं. आजही ज्यांना देता येईल ते दिलं. ते लोकं नाराज. गेले चारपाच दिवस मातोश्रीला आल्यावर लोक येत आहे. साधी माणसं येत आहेत. साधी माणसं येत आहेत. साहेब काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत. कमाल आहे. ज्यांना दिलं ते नाराज. ज्यांना नाही दिल ते ते सोबत आहे… हे हिंमतीने सोबत आहे. याला म्हणतात माणूसकी शिवसेना आणि याला म्हणतात शिवसैनिक, हे आपलं नातं आहे. त्या नात्याच्या जोरावर शिवसेना मजबूत उभी राहिली. अनेक आव्हानं आली. पण या साध्या माणसाच्या साथीने परतवली आहे. आजही न्याय देवतेने निकाल दिला आहे. न्याय देवता म्हटल्यावर न्याय देवतेचा निकाल मान्य असायलाच पाहिजे. आपण आपली बाजू मांडली पाहिजे. उद्या फ्लोअर टेस्ट, जसं कोरोना टेस्ट तसं. हा एक भाग. राज्यपाल महोदयांनी फ्लोअर टेस्ट करण्याचा आदेश दिला आहे.
Uddhav Thackeray resigns as Chief Minister