चंद्रपुर जिल्ह्यातील नगर परिषद / पंचायत आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 1 ऑगस्टपर्यंत आमंत्रित Nagar Parishad / Panchayat of Chandrapur district invited objections and suggestions regarding reservation and draw till 1st August

चंद्रपुर जिल्ह्यातील नगर परिषद / पंचायत आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 1 ऑगस्टपर्यंत आमंत्रित

चंद्रपूर, दि. 28 जुलै : चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा, बल्लारपूर, राजुरा, मूल, चिमूर, घुग्घुस,  नागभीड या नगर परिषदांमधील व भिसी या नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडत पध्दतीने 28 जुलै 2022 रोजी निश्चित करण्यात आलेले आहेत.
सदर आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 29 जुलै ते 1 ऑगस्ट 2022 पर्यंत संबंधित नगर परिषद / नगर पंचायत कार्यालयात मागविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.

Nagar Parishad / Panchayat of Chandrapur district invited objections and suggestions regarding reservation and draw till 1st August