900 नागरिकांना पुरविले भोजन
चंद्रपुर मनपाने केले होते मदतीचे आवाहन
#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 14 जुलै: आपदग्रस्तांना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या महावीर इंटरनॅशनल संस्थेने चंद्रपूर येथिल पूरग्रस्तांना मदत करून पुन्हा एकदा आपल्या सेवाभावी वृत्तीचा परिचय दिला आहे. महावीर इंटरनॅशनल च्या कार्याची जिल्ह्यात सर्वत्र ख्याती असल्याने चंद्रपूर महानगर पालिकेने पुरामुळे मनपाच्या शाळांमध्ये नागरिकांना स्थलांतरित केले होते. सुरुवातीला मनपाने 600 नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती महावीर इंटरनॅशनल संस्थेस केली होती मात्र दिवसभरात विस्थापितांची संख्या जवळपास 900 च्या घरात गेली मात्र संस्थेने विस्थापितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आधीच लक्षात घेऊन ह्या सर्व नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात महावीर इंटरनॅशनल ही सामाजिक संस्था वेगवेगळे उपक्रम राबवित असते. 2006, व 2013 ला आलेल्या पुर परिस्थिती मधेही संस्थेने शहरातील विस्थापित नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. यावर्षी ही मागिल 5 दिवसापासून सतत येत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराचा बराच भाग पाण्याखाली गेला आहे. त्या परिसरातील नागरिकांना महानगर पालिकेतर्फे नागरिकांना शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
चंद्रपुर मनपा तर्फे ह्या विस्थापित नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्याकरिता सर्वप्रथम महावीर इंटरनॅशनल ला कळविण्यात आले. प्रशासनाने विनंती करताच महावीर इंटरनॅशनल ची चमू सकाळ पासुन जैन भवन येथे स्वयंपाक तयार करुन विवीध शाळेत आधार घेतलेल्या विस्थापित नागरिकांना संस्थेचे संस्थापक अधक्ष फेंनबाबू भंडारी, दिलीप भंडारी, हरीश मुथा, पंकज बोथरा, तुषार डगली, नरेश तालेरा, जीतेन्द्र चोरडिया, विशाल कल्लुरवार, विमल देसाई, विशाल मुथा, मनीष खटोड, मनीष भंडारी, अमित बैद, जीतेन्द्र जोगड, त्रिशूल बंब, विवेक तातीवार, देवेंद्र वर्मा, अभय ओस्तवाल, गौतम भंडारी, पंकज खजांची ह्यांच्या उपस्थितीत भोजन वितरित करण्यात आले.
महावीर इंटरनॅशनल चंद्रपुर तर्फे पूर पीडितांना दररोज भोजन वितरित करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात महावीर इंटरनॅशनल तर्फे या पूर्वी आयकॅम्प, मागिल दहा वर्षापासून मोतिया बिंदू कॅम्प घेउन ऑपरेशन सुद्धा करण्यात येतं आहे. तसेच युरोलॉजी कॅम्प, ब्रेस्ट कॅन्सर, अपंग व्यकीना कृत्रिम हात पाय बसविण्याचे कॅम्प व विवीध उपक्रम घेण्यात येतात हे विशेष.
Once again Mahavir International Chandrapur to help the flood victims, provided food to 900 citizens, Chandrapur City Municipal Corporation appealed for help.