केंद्र सरकार विरोधात उद्या शुक्रवारी आंदोलन Agitation tomorrow Friday against the central government

केंद्र सरकार विरोधात उद्या शुक्रवारी आंदोलन

चंद्रपुर, 21 जुलै : मोदी सरकार केंद्रीय यंत्रणाचा वापर करीत ईडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या वतीने दिलेल्या आदेशानुसार विभागस्तरावर आंदोलन करण्यात आले. आता जिल्हास्तरावर आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उद्या शुक्रवार 22 जुलै 2022 रोजी दुपारी 3:00 वाजता गांधी चौक, चंद्रपूर येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनाइजेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागातील कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदवावा. असे आव्हान रितेश (रामू) तिवारी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर यांनी केले आहे.

Agitation tomorrow Friday against the central government