चंद्रपुरातील रहमत नगर येथील २५ घरातील नागरीकांना नेण्यात आले सुरक्षीत स्थळी #Citizens #RahmatNagarChandrapur #SafePlace #Chandrapur

चंद्रपुरातील रहमत नगर येथील २५ घरातील नागरीकांना नेण्यात आले सुरक्षीत स्थळी 

चंद्रपूर १३ जुलै - रहमत नगर येथे पाणी साचल्याने खबरदारी म्हणुन परीसरातील २५ घरातील नागरीकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले शाळा घुटकाळा व सरदार पटेल कन्या शाळा येथे या नागरीकांना आणण्यात आले असुन इतर नागरीकांनाही आणण्याची मोहीम सुरु आहे.
ईरई धरणाचे सातही दरवाजे १.० मीटरने उघडण्यात आल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ होऊन रहमत नगर परीसरातील नागरीकांच्या घरात पाण्याचा शिरकाव सुरु झाला. परिस्थितीवर लक्ष ठेऊन असणाऱ्या महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने बचाव कार्य सुरु करून नागरीकांना सुरक्षित स्थळी आणले गेले आहे. येथे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, वैद्यकीय सुविधा मनपामार्फत पुरविण्यात येत आहेत.
Citizens from 25 houses at Rahmat Nagar in Chandrapur were taken to a safe place.