आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन, मुख्‍यमंत्र्यांच्‍या नेतृत्‍वात महाराष्‍ट्र विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर होईल – आ. सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर जिल्‍हयातील विविध प्रश्‍नांबाबत झाली चर्चा Congratulations by Mla Sudhir Mungantiwar to Chief Minister Eknath Shinde

❇️ आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन 

❇️ मुख्‍यमंत्र्यांच्‍या नेतृत्‍वात महाराष्‍ट्र विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर होईल – आ. सुधीर मुनगंटीवार

❇️ चंद्रपूर जिल्‍हयातील विविध प्रश्‍नांबाबत झाली चर्चा

मुंबई: माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची भेट घेत त्‍यांचे अभिनंदन केले व यशस्‍वी कार्यकाळासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी बांबुपासून तयार करण्‍यात आलेला तिरंगा ध्‍वज भेट देत आ. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांचे स्‍वागत केले.
महाराष्ट्र राज्‍यातील दीन, दुर्बल, शोषित, पिडीत, उपेक्षित, वंचित जनतेच्‍या समस्‍या मार्गी लावत राज्‍याला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करण्‍यासाठी आपणास बळ लाभावे अशी प्रार्थना श्री सिध्‍दीविनायकाचरणी करत असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्‍व. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्‍व. आनंद दिघे यांचा हिंदुत्‍वाचा विचार घेवून महाराष्‍ट्राचे कल्‍याण करण्‍यासाठी निघालेल्‍या एकनाथराव शिंदे यांच्‍यासोबत आपण सर्वशक्‍तीनिशी असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. यावेळी झालेल्‍या चर्चेत चंद्रपूर जिल्‍हयातील विविध समस्‍या व प्रश्‍नांबाबत आ. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा केली. याबाबत लवकरच आढावा घेत हे प्रश्‍न मार्गी लावण्‍याबाबत सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Congratulations by Mla Sudhir Mungantiwar to Chief Minister Eknath Shinde.
Maharashtra will be on the path of development under the leadership of the Chief Minister.  
Mla Sudhir Mungantiwar, Discussion was held on various issues in Chandrapur district.