विकास आराखड्यांना स्थगिती
मुंबई : सर्वच विकासकामांना ब्रेक लावणार नाहीत. घाईगडबडीत मजूर झाले प्रस्ताव स्थगित करत आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिली आहे. ते मुंबईत अधिवेशन संस्थगित झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. आमचे सरकार नियमानुसार काम करणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे. राज्यात नवे सरकार आल्यापासून आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला ब्रेक लावण्याचा धडाका लावला आहे. त्यावर पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मात्र काही निर्णय सरकारने घेत विकास आराखड्यांना ब्रेक लावला आहे. एक एप्रिलनंतरच्या विकास आराखड्यांना या सरकारने स्थगिती दिली आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना यासंबंधी पत्रही पाठवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) हा मोठा दणका या सरकारने दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.