भाजपा जैन प्रकोष्ठ द्वारा निशुल्क कर्करोग निदान शिबिराचे उद्घाटन
आ. सुधीरभाऊं मुनगंटीवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
चंद्रपुर: भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र कार्यकारणी द्वारा राबविण्यात येणाऱ्या कर्करोगमुक्त महाराष्ट्र या अभियानांतर्गत महाराष्ट्रातल्या चंद्रपूर येथील जैन भवन मध्ये आयोजित १११व्या शिबिराचे उद्घाटन दि. २४ जुलै २०२२ ला भाजप नेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन चे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व अग्रिकल्चरचे प्रदेशाध्यक्षह ललितजी गांधी होते, कार्यक्रमाचे उद्घाटक सुधीरभाऊ मुनगंटीवार याप्रसंगी बोलताना म्हणाले की जैन समाज नेहमी जनसेवा व समाजसेवे करिता तत्पर असतो. महाराष्ट्र कॅन्सर मुक्त अभियान हा खूप मोठा उपक्रम जैन समाजाने हाती घेतला आहे. त्यांनी चंद्रपूरच्या गोरगरीब जनतेला याचा पुरेपूर फायदा घ्यावा असे आव्हान सुद्धा केले आहे. कर्करोग हा जेवढा उशिरा माहिती होतो तेवढेच त्याचा उपचार करणे कठीण होत जाते, या कर्करोग निदान शिबिरात लोकांची तपासणी होऊन त्याचा त्वरित इलाज पण करता येईल.
कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीपदादा भंडारी यांनी महाराष्ट्रात झालेल्या ११० व्या शिबिराची विस्तृत माहिती देताना सांगितले की जनवरी २०२२ मध्ये पहिल्या शिबिराचे उद्घाटन मुंबईमध्ये अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले होते तर शंभराव्या कॅम्पचे उद्घाटन नागपूर मध्ये केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते झाले तर १११ व्या शिबिराची उद्घाटन चंद्रपूर मध्ये आमदार सुधीरभाऊ यांच्या हस्ते होत आहे. भाजपा जैन प्रकोष्ठ या वर्षी 200 शिबिरा अख्या महाराष्ट्रात पूर्ण करेल व पस्तीस हजार लोकांची तपासणी या कॅम्प च्या माध्यमातून होईल असेही त्यांनी जाहीर केले.
भाजप जैन प्रकोष्ठ चंद्रपूर महानगर अध्यक्ष हेमंतराज सिंघवी यांच्या संकल्पनेतून व महानगर महिला अध्यक्ष सौ वंदना गोलेच्छा यांच्या प्रयत्नाने दहावी आणि बारावीत उत्तीर्ण झालेल्या वीस गुणवंत जैन विद्यार्थ्यांचे सन्मान आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात दहावीत प्रथम आलेल्या कु. पलक विनय डांगी चा विशेष कौतुक करण्यात आला. कार्यक्रमात भाजप महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपचे जैन नेते मनोज सिंघवी, भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत मानेकर, प्रदेश सचिव निर्भय कटारिया, प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा, महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जैन प्रकोष्ठचे महानगर अध्यक्ष हेमंतराज सिंघवी यांनी पुढचे शिबिर २७ ला बल्लारशा येथील कोठारी येथे २८ ला मुल येथील राजोली, २९ ला जैन भवन चंद्रपूर व ३० ला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर इथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती दिली व सर्व गरजूंनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन सुद्धा केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन प्रकोष्ठचे महानगर उपाध्यक्ष अभिषेक काष्टीया व कार्यकारणी सदस्य त्रिशूल बंब यांच्याद्वारे करण्यात आले. चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्ष सौ अर्चना मुनोत यांनी आभार प्रदर्शन करत सर्व उपस्थित अतिथींचे व पाहुण्यांचे विशेषतः डॉ सुशील मुंदडा, डॉ यश जैन, डॉ वसीम नागाने, डॉ अक्षय रागीट व डॉ प्रीती चव्हाण यांचे आभार मानले.
कार्यक्रमाला सौ अर्चना मुणोत, महानगर महिलाध्यक्ष सौ वंदना राहुलजी गोलेच्छा, उपाध्यक्ष पंकज गोलेच्छा, अभिषेक काष्टीया, देवेंद्र डगली, विशाल मुथा, महासचिव रोहन शहा, अनिल बोथरा, सुनील पंचोली, सहसचिव निर्मल भंडारी, कार्यकारणी सदस्य त्रिशूल बंब, पलाश सिंघवी, रिषभ सकलेचा, सौ. अनिता अमरजी गांधी, सौ पायल लोढा, सौ राजुल नरेंद्र मुथा, सौ. दिशा रोहनजी शाह, सौ. नैना पंकज मुथा.
जैन समाज चंद्रपुर चे प्रतिष्ठित नागरिक यांची विशेष उपस्थिती होती खासकरुन देवेंद्रजी बांठीया, फेनबाबू भंडारी, रविंद्रजी बैद, संदीपजी बांठीया, योगेशजी पुगलीया, दिलीपजी दुग्गड, जितेंद्रजी जोगड, विवेकजी जैन, रमेशजी बोथरा, नरेंद्र मुथा, संजयजी दुग्गड, जितेंद्र सुराणा, महेंद्रजी सकलेचा, गौतम भंडारी, पंकज मुथा, राजू बोरा, धर्मेंद्र सकलेचा, अभिदीप सिंघवी, रुपेश दुग्गड, विप्लव सिंघवी, अनुभव संकारी, पियुष दुगड, कल्पेश सिंघवी, शशांक धानुका, करन आनंद, सौ. जयमाला सिंघवी, सौ शिल्पा कांष्टीया, सौ मीना आनंद सह अनेक मान्यवराची उपस्थित होती.