घुग्गुस शहरातील भूस्खलन प्रकरणी मंत्री सुधीर मुनगंटीवार दिली घटनास्थळाला भेट..! इतरत्र हलविण्यात आलेल्या कुटुंब प्रमुखांना मुख्यमंत्री सहायता निधितुन प्रत्येकी 10 हजार रु मिळणार, भाजप तर्फे प्रत्येकी 3 हजाराची मदत Minister Sudhir Mungantiwar visited the site of the landslide in Ghuggus town..! Heads of families shifted elsewhere will get Rs 10,000 each from the Chief Minister's Assistance Fund 3 thousand each by BJP

घुग्गुस शहरातील भूस्खलन प्रकरणी मंत्री सुधीर मुनगंटीवार दिली घटनास्थळाला भेट..!

इतरत्र हलविण्यात आलेल्या कुटुंब प्रमुखांना मुख्यमंत्री सहायता निधितुन प्रत्येकी 10 हजार रु मिळणार 

भाजप तर्फे प्रत्येकी 3 हजाराची मदत

चंद्रपुर (घुग्गुस) : घुग्गुस शहरातील भूस्खलन प्रकरणी जमीनित गेलेल्या घरानजीकची जी घरे सावधानीचा उपाय म्हणून इतरत्र हलविण्यात आली त्या कुटुंब प्रमुखांना मुख्यमंत्री सहायता निधितुन प्रत्येकी 10 हजार रु चे अर्थसहाय्य देण्यात येईल अशी घोषणा आज केली. तसेच भारतीय जनता पार्टी तर्फे प्रत्येकी 3 हजार रु. ची मदत या कुटुंब प्रमुखांना देण्यात येणार आहे.
आज दि. 27 ऑगस्ट रोजी घुग्गुस शहरात भुस्खलनाची घटना घडली त्या ठिकाणी भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत याविषयी माहिती दिली. यावेळी केलेल्या विनंती नुसार मुख्यमंत्र्यांनी संबंधित कुटुंब प्रमुखांना 10 हजार रु चे अर्थसहाय्य मुख्यमंत्री निधितुन देण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक घेवून उपाययोजनेची दिशा निश्चित करू असेही याप्रसंगी सांगितले. 
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, विवेक बोढ़े आदी भाजप पदाधिकारी तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वेकोली चे महाप्रबंधक आभास सिंग, डीजीएमएस चे अधिकारी उपस्थित होते.
Minister Sudhir Mungantiwar visited the site of the landslide in Ghuggus town..!

Heads of families shifted elsewhere will get Rs 10,000 each from the Chief Minister's Assistance Fund

3 thousand each by BJP