अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, उद्या 17 ऑगस्टला सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगान In the wake of Amrit Mahotsav Group National Anthem tomorrow 17th August at 11 am

अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

उद्या 17 ऑगस्टला सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगान

चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट: स्वराज्य महोत्सवातंर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगान घेण्यात येणार आहे. यात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था व इतर शासकीय कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता राष्ट्रगीत म्हणण्यात येणार आहे.  खाजगी आस्थापनांमध्ये सुद्धा राष्ट्रगीत म्हणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. नागरिकांनी 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आहे त्या जागेवर उपस्थित राहून राष्ट्रगीत म्हणावयाचे आहे. समूह राष्ट्रगीत कार्यक्रमात सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

In the wake of Amrit Mahotsav

Group National Anthem tomorrow 17th August at 11 am