लग्न ठरलंय? मग ही बातमी वाचापत्रिकेत होणार मोठा बदल Marriage is decided? Then read this newsA big change will happen in the newspaper

👩‍❤️‍👨 लग्न ठरलंय? मग ही बातमी वाचा

📜 पत्रिकेत होणार मोठा बदल

📜 लग्नपत्रिकेत आता वधू-वराची जन्मतारीख व वय अनिवार्य? 

👩‍❤️‍👨 बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

#Loktantra Ki Awaaz 
मुंबई : महाराष्ट्र राज्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित नव्या नियमानुसार, लग्नपत्रिकेवर वधू-वरांचे नावासोबत त्यांची जन्मतारीख आणि वय नमूद करणे बंधनकारक करण्याचा विचार सुरू आहे. या निर्णयामुळे विवाहासाठी आवश्यक असलेले कायदेशीर वय सहज तपासता येणार असून बालविवाह रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमधून समोर आलेल्या बालविवाहाच्या चिंताजनक आकडेवारीनंतर शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. विशेषतः परभणी जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती समोर आल्यानंतर या संदर्भातील उपाययोजनांना वेग आला आहे.
राजस्थानमध्ये यापूर्वी अशा प्रकारचा नियम लागू करण्यात आला असून त्याचा अभ्यास करून महाराष्ट्रातही तत्सम नियम लागू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा नियम लागू झाल्यास विवाहपत्रिका छापताना वधू-वरांची जन्मतारीख आणि वय नमूद करणे आवश्यक ठरणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे विवाहाचे वय कायदेशीर आहे की नाही, याची प्राथमिक पडताळणी सहज शक्य होईल. तसेच बालविवाहाच्या घटनांमध्ये घट होण्यास मदत मिळेल. सामाजिक संस्था आणि महिला-बालकल्याण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
👉🏻 बालविवाह प्रतिबंधक कायदा काय सांगतो?
देशात लागू असलेल्या बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार मुलीचे विवाहासाठी किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे किमान वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह करणे किंवा विवाह घडवून आणणे हा कायदेशीर गुन्हा आहे.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दोन वर्षांपर्यंत कारावास, एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यामध्ये विवाह लावणारे व्यक्ती, पालक, नातेवाईक तसेच बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्यांवरही कारवाईची तरतूद आहे.
👉🏻 समाजहिताचा निर्णय
बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि भविष्य धोक्यात येते. त्यामुळे विवाहपत्रिकेत जन्मतारीख आणि वय नमूद करण्याचा प्रस्तावित नियम हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून समाजातील बालविवाहाच्या प्रथेला आळा घालण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. शासनाकडून या संदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Marriage is decided? Then read this news

A big change will happen in the newspaper 

#Marriageisdecided? 
#ThenreadthisnewsAbhigchangewilhappeninthenwesapper
#Balvivah 
#Marriage