चंद्रपुर मनपातर्फे स्वातंत्र्य सेनानी यांचा सत्कार Freedom fighter felicitated by Chandrapur Municipal Corporation

चंद्रपुर मनपातर्फे स्वातंत्र्य सेनानी यांचा सत्कार 

चंद्रपूर १० ऑगस्ट -   भारतीय स्वातंत्राचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत चंद्रपूर शहरातील स्वातंत्र्य सेनानी यांचा चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
विविध कार्यक्रमांद्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या प्रवासाचे महत्व नविन पिढीला सांगणे तसेच प्रसिद्धीपासुन दुर राहीलेल्या स्वातंत्र्य सैनिकांसह प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अधोरेखित करणे हा भारतीय स्वातंत्राच्या अमृत महोत्सवाचा उद्देश आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्य सेनानी बाबुरावजी वनकर, डॉ. इंगोले, विजय थोरात यांचा, त्यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. 
स्वातंत्र्यलढ्यातील निष्ठा आणि स्वातंत्र्याचे स्वप्न घेऊन पारतंत्र्यात वावरणारी पिढी यांचे एक अनोखे युग होते. स्वातंत्र्य हे एकमेव स्वप्न उराशी बाळगुन आपले स्वातंत्र्य सेनानी आपले संपुर्ण जीवन जगले आहेत. देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य सेनानी यांचे महत्व अनन्य साधारण असून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांचे स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण योगदान असल्याचे आयुक्त यांनी सांगीतले.  

याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे,सहा.आयुक्त विद्या पाटील उपस्थीत होते.

Freedom fighter felicitated by Chandrapur Municipal Corporation.