"हर घर तिरंगा" निमित्त " तिरंग्यासोबत सेल्फी " स्पर्धा, चंद्रपुर मनपातर्फे रोख बक्षीसे १७ ऑगस्ट पर्यंत पाठविता येतील सेल्फी, सेल्फी स्पर्धेअंतर्गत विजेत्यांस "हे आहे" रोख बक्षिस "Har Ghar Triranga" "Selfie With Triranga" contest, cash prizes can be sent by Chandrapur Municipal Corporation till August 17. Selfie, Selfie Contest Winners "Here's" Cash Prize

"हर घर तिरंगा" निमित्त " तिरंग्यासोबत सेल्फी " स्पर्धा

चंद्रपुर मनपातर्फे रोख बक्षीसे
१७ ऑगस्ट पर्यंत पाठविता येतील सेल्फी 

सेल्फी स्पर्धेअंतर्गत विजेत्यांस "हे आहे" रोख बक्षिस

चंद्रपूर ०२ ऑगस्ट -  चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा मोहीम जनजागृतीसाठी येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान " तिरंग्यासोबत सेल्फी " Selfie with Tiranga स्पर्धा राबविली जाणार असुन यात राष्ट्रध्वजाचा पुर्ण सन्मान राखुन आपल्या घरी तिरंगा फडकाविणाऱ्या नागरीकांना रोख तसेच मोमेंटो रुपी बक्षिसे दिली जाणार आहेत.

या सेल्फी स्पर्धेअंतर्गत विजेत्यांस रोख बक्षिसे देण्यात येणार असुन प्रथम रु. ११,०००/- द्वितीय रु. ७०००/- तृतीय रु. ५०००/-  तसेच २१ प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. नागरीकांना स्वतः च्या घरी लावलेल्या तिरंग्यासोबतचे क्षण सेल्फीद्वारे टिपुन चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे दिलेल्या गुगलशीट वर पाठवु शकता वा QR कोड स्कॅन करू शकता. तसेच सेल्फी आपल्या सोशल मिडियावर अपलोड करावयाची आहे. अपलोड करतांना #cmc #हर घर तिरंगा #चंद्रपूर हे सर्व हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. सेल्फीमध्ये घर व तिरंगा स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. या स्पर्धेचा कालावधी १३ ते १५ ऑगस्ट असुन सेल्फी पाठविण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२२ ही  आहे.स्पर्धेनंतर ईश्वरचिट्ठीद्वारे निकाल घोषित करण्यात येणार आहे.             

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शासन निर्देशानुसार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तीन दिवस देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. या वर्षी आपला देश स्वतंत्र होण्यास 75 वर्ष पुर्ण होणार आहेत म्हणुन हा 75 वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे.या अभियानात सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेच्या CMCchandrapur या फेसबुक पेजला भेट द्यावी.

"Har Ghar Triranga" "Selfie With Triranga" contest, cash prizes can be sent by Chandrapur Municipal Corporation till August 17. Selfie, Selfie Contest Winners "Here's" Cash Prize.