Heavy Rain In Maharashtra : पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस, विदर्भात अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, कोकणात, मुसळधार पाऊस, जाणून घ्या महाराष्ट्र राज्यात कशी राहणार पाऊसाची स्थिती ? Vidarbha, Kokan, Madhya Maharashtra

Heavy Rain In Maharashtra  : पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस,

विदर्भात अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, कोकणात, मुसळधार पाऊस, 

जाणून घ्या महाराष्ट्र राज्यात कशी राहणार पाऊसाची स्थिती ?

मुंबई : जुलै महिन्याच्या अंतिम टप्प्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात (Rain) पावसाने उघडीप दिल्याने सर्वकाही सुरळीत होईल असे चित्र झाले होते. शिवाय ऑगस्टमध्ये सरासरीएवढाच पाऊस बरसणार असल्याचेही सांगण्यात आले होते. पण दुसऱ्या आठवड्याच चित्र बदलत आहे. राज्यात  पावसाचे पुनरागमन झाले असून पुढील 5 दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पण मुसळधार पाऊस बरसणार आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: नदी काठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन  हवामान विभागाने केले आहे.कोकणातील रायगड, रत्नागिरी तर मुंबई पुण्यातही जोरदार पाऊस होणार आहे. पालघर, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जनजीवन तर विस्कळीत होईलच पण खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
(Meteorological Department) (The return of rain)
ऑगस्ट महिन्यात सरासरीएवढा पाऊस पडेल असा अंदाज होता. पण दुसऱ्या आठवड्यातच निसर्गाने लहरीपणा दाखवण्यास सुरवात केली आहे.10 दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे. विदर्भात 10 ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर 10 ऑगस्ट रोजी याच विभागात अतिवृष्टी होणार असल्याचाही अंदाज आहे.

आतापर्यंत झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसानच झाले आहे. पेरणी होताच उगवलेली पिके ही गेल्या महिन्याभरापासून पाण्यात आहेत. आता कुठे उघडीप होण्यास सुरवात झाली होती. मात्र, पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे उत्पादनात घट तर निश्चित आहेच पण आगामी काळात मुसळधार पाऊस झाला तर खरीप हंगामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.
Heavy Rain In Maharashtra : Heavy rain for next 5 days,
Heavy rains in Vidarbha, Madhya Maharashtra, Konkan, Heavy rains,
Know how the state of rain will be in Maharashtra state?