शिवसेनाच्या दसरा मेळाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिला हा मोठा निकाल Bombay High Court gave this big verdict regarding Dussehra Mela

शिवसेनाच्या दसरा मेळाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिला हा मोठा निकाल

मुंबई  : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात गेल्या महिन्याभरापासुन अनुत्तरित असलेल्या प्रश्ननांनचे उत्तर आज मिळाले आहे. मुंबई येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरे गटाचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दसरा मेळावा (Dussehara Melava) घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवाजीपार्कवर दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार आहे.  शिवाजी पार्कवर (Shivaji Park Dadar Mumbai) दसरा मेळावा कोणी घेणार यावरुन राजकारण चांगलंच तापलं होतं. ठाकरे गट (Udhav Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) दोघांकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर हा वाद मुंबई हायकोर्टात (Mumbai HighCourt) गेला. 
हायकोर्टात आज दोन्ही गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. शिंदे गटाच्यावतीने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करणारी हस्तक्षेप याचिका आमदार सदा सरवणकर यांनी केली होती. पण ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला हा मोठा दणका बसला. तसंच पालिकेने कायद्यानुसार निर्णय घेतलेला नाही असं सांगत कोर्टाने पालिकेलाही फटकारलं आहे.
उद्धव ठाकरे गटाच्यावतीने आस्पी चिनॉय यांनी बाजू मांडली. कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षात दसरा मेळावा होऊ शकलेला नाही. आता शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी या नात्याने अनिल देसाई (Anil Desai) यांनी पालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती.शिवसेनेच्यावतीने पहिला अर्ज करण्यत आला होता. पण कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत पालिकेने परवानगी नाकारली. 2016 मध्ये राज्य सरकारने अध्यादेश काढत शिवसेनेला दसरा मेळावा घेण्याची रितसर परवानगी दिली आहे, असा युक्तीवाद ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आला.
मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation, BMC) वतीने वकिल मिलिंद साठे यांनी युक्तीवाद केला. शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान असून ते शांतता क्षेत्रात मोडतं असं राज्य सरकारचा आदेश आहे. तसंच दसरा मेळावा झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा मुंबई पोलिसांचा अहवाल आहे. त्यामुळे कोणचाही बाजू न घेता कायदेशीर पद्धतीने कोणालाच परवानगी दिली नव्हती असा युक्तीवाद साठे यांनी केला.

दसरा मेळाव्याच्या (Shivsena Dasra Melava 2022) ठिकाणी सुरक्षा दिली जाऊ शकते, मात्र सभास्थळी पोहचण्यापर्यंत रस्त्यात दोन्ही गट एकमेकांसमोर येऊ शकतात. एकाच गटातून दोन्ही गट निर्माण झाले आहेत. प्रत्येक विभागात दोन गट आहेत आणि त्यामुळेच मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचताना वाद विवाद होऊ शकतो. याचा प्रत्यय गणपती विसर्जन मिरवणुकीत दादरला (Mumbai Dadar) आला आहे, असा आक्षेप पालिकेने घेतला होता.

Bombay High Court gave this big verdict regarding Dussehra gathering of Shiv Sena

 MUMBAI: The questions that have been unanswered for the past month in Maharashtra state politics have been answered today.  It has become clear that the Dussehra gathering will be held by the Uddhav Thackeray group at Shivaji Park in Mumbai.  Bombay High Court has allowed Uddhav Thackeray to hold Dussehara Melava.  Therefore, only Uddhav Thackeray's voice will be heard in Dussehra Mela at Shivaji Park.  Politics was heated up over who would hold Dussehra Mela at Shivaji Park (Shivaji Park Dadar Mumbai).  Both Thackeray group (Udhav Thackeray Group) and Shinde Group (Shinde Group) had applied to hold Dussehra Mela at Shivaji Park.  After that the dispute went to Mumbai High Court (Mumbai High Court).

 Arguments were made by both groups in the High Court today.  MLA Sada Saravankar filed an intervention petition demanding permission for Dussehra gathering at Shivaji Park on behalf of the Shinde group.  But this petition was rejected by the High Court, so the Eknath Shinde group got a big blow.  Also, the court has reprimanded the municipality saying that the municipality has not taken a decision according to the law.

 Aspi Chinoy argued on behalf of the Uddhav Thackeray group.  Dussehra gathering could not be held in the last two years due to Corona.  Now Anil Desai, as an office bearer of Shivsena, had properly sought permission from the municipality.  The first application was made on behalf of Shiv Sena.  But the municipality refused permission citing law and order.  It was argued on behalf of the Thackeray group that the state government passed an ordinance in 2016 and duly permitted the Shiv Sena to hold a Dussehra gathering.

 Advocate Milind Sathe argued on behalf of Mumbai Municipal Corporation (BMC).  The state government has ordered that Shivaji Park is a playground and falls under the peace zone.