चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा विसर्जनदिनी उपक्रम
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात शुक्रवारी (ता. ९) लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. त्यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भक्तगण गाण्याच्या तालावर नाचत, ढोलताशांच्या गजरात गणरायाला निरोप देत होते. गणेश विसर्जनाचे औचित्य साधून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील गणेश मंडळ अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
चंद्रपुर शहरातील गणेशभक्तांनी वाजतगाजत, मोठ्या धूमधडक्यात श्री गणरायाची स्थापना केली होती. मागील दहा दिवस सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. काल अनंत चतुर्थीला चंद्रपूर शहरातील भक्तांनी मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप दिला. शहरातील कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी या प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी मार्गावर भव्य मंडप उभारण्यात आला. यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच गणेशभक्तांवर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला खासदार बाळूभाऊ धानोरकर, जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, ज्येष्ठ नेते तथा इंटकचे महासचिव के. के. सिंह, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, संतोष लहामगे, वीना खणके, सकिना अन्सारी, चित्राताई डांगे, सुनीता अग्रवाल, राधिका बोहरा (तिवारी), गोपाल अमृतकर, ओबीसी विभागाचे प्रदेश पदाधिकारी उमाकांत धांडे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्रवीण पडवेकर, पप्पू सिद्दीकी, पिंटू शिरवार, कुणाल चहारे, नौशाद शेख, संजय गंपावार, भालचंद्र दानव, मनीष तिवारी, राज यादव, राजीव खजांची, मोहन डोंगरे, साबीर शेख, चंदाताई वैरागडे, रमिझ शेख, कुणाल रामटेके, सागर खोब्रागडे, प्रवीण नेल्लुरी, काशिफ अली, केतन दुर्सेलवार, मोनू रामटेके, पूजा आहुजा, विनोद वाघमारे, वैभव येरगुडे, राकेश मारकंडवार, राजू रंगारी, राजेश वर्मा, अशोक गड्डमवार, विजय पोहनकर, योगानंद चंदनवार, एजाजभाई
यांच्यासह चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभाग, ओबीसी विभाग, किसानसेल, अल्पसंख्यांक सेल यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आॅर्गनायझेनशचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Congress felicitated Ganesha Mandals in Chandrapur City,
immersion day activities of Chandrapur City District Congress Committee