माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांना नवराष्ट्र-नवभारतचा२०२२ चा मराठी अस्मिता पुरस्कार, उत्कृष्ट विकासाभिमुख नगराध्यक्ष म्हणून करण्यात आला सत्कार..! Former Mayor Ahetesham Ali was felicitated as Marathi Asmita Award 2022 of Navrastra-Navbharat, as an outstanding development oriented Mayor..!

माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांना नवराष्ट्र-नवभारतचा२०२२ चा मराठी अस्मिता पुरस्कार

उत्कृष्ट विकासाभिमुख  नगराध्यक्ष म्हणून करण्यात आला सत्कार..!

चंद्रपुर: नवभारत-नवराष्ट्र तर्फे सामान्य ते असामान्य अशा प्रवासातल्या कार्यरत मान्यवरांची दखल घेणारा, त्यांना एक स्थान,सन्मान आणि अभिमान याची जाणीव करुन देणारा नवराष्ट्र मराठी अस्मिता पुरस्कार  २०२२ सोहळा चंद्रपुर येथे आयोजित करण्यात आला.या प्रसंगी विकासाभिमुख उत्कृष्ट नगराध्यक्ष हा पुरस्कार महाराष्ट्राचे वन,सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री मा.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार व मराठी-हिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेते श्री.अतुल परचुरे यांच्या हस्ते श्री.अहेतेशाम अली यांना देण्यात आला. 
या प्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.अजय गुल्हाने साहेब,गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे,नवभारत-नवराष्ट्र समूहचे उपाध्यक्ष-श्री.संदीप विश्नोई,जिल्हा प्रतिनिधी-प्रशांत विघ्नेश्वर,व्यवस्थापक-प्रशांत चहारे, अनेक पत्रकार बंधु,विविध क्षेत्रातिल अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक लोकांची उपस्थिती या प्रसंगी होती.

Former Mayor Ahetesham Ali was felicitated as Marathi Asmita Award 2022 of Navrastra-Navbharat, as an outstanding development oriented Mayor..!