Nagpur-Mumbai Superfast Expressway Toll : समृद्धी महामार्गावर इतक्या हजार रुपयांचा टोल, चारचाकी गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोलची वसुली करण्यात येणार #Nagpur-Mumbai-Superfast-ExpressWay #SamruddhiMahamarg #Nagpur #Mumbai #TollTax #DreamProject

Nagpur-Mumbai Superfast Expressway Toll : समृद्धी महामार्गावर इतक्या हजार रुपयांचा टोल

चारचाकी गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोलची वसुली करण्यात येणार 

#Loktantrakiawaaz
नागपुर : समृद्धी महामार्गाच्या टोलची माहिती देणारा बोर्ड महामार्गाच्या कडेला लावण्यात आला आहे. त्या बोर्डवर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी (Mumbai-Nagpur Expressway Toll) नेमका किती टोल भरावा लागणार, यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गासंदर्भातील  मुंबई-नागपूर 701 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास 1200 रुपये टोल भरावा लागणार आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण केलं जाणार आहे. त्यानंतर मुंबई ते नागपूर हे 701 किलोमीटरचं अंतर वेगानं पार करता येईल. मात्र या महामार्गावर वाहनांना नेमका किती टोल भरावा लागणार यासंदर्भात अधिकृत आकडेवारी समोर आलीय. (Mumbai Nagpur Superfast Expressway 4 wheelers will have to Pay Around Rs 1200 Toll)
समृद्धी महामार्गाच्या टोलची माहिती देणारा बोर्ड महामार्गाच्या कडेला लावण्यात आला आहे. त्या बोर्डवर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नेमका किती टोल भरावा लागणार, यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. टोलचे दर 31 मार्च 2025 पर्यंत अर्थात पुढील 3 वर्षांसाठी लागू असतील, असंही या बोर्डवर नमूद करण्यात आलंय. महामार्गावर प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोलची वसुली करण्यात येणार आहे.

➡️ मुंबई-पुणे Express Way Toll
मुंबई पुणे एक्प्रेस वेवरील प्रवासही आता महागणार आहे. मुंबई पुणे एक्प्रेस वे मार्गावरच्या टोलमध्ये (Toll) तब्बल 18  टक्के वाढ होणार आहे. 1  एप्रिल 2023 पासून ही वाढ होणार आहे. त्यामुळे आता मुंबई पुणे एक्प्रेस वेवरून (Mumbai–Pune Expressway) प्रवास करणाऱ्यांना जास्त टोल भरावा लागणार आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे च्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18  टक्के वाढ करण्यात येईल अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने (MSRDC) 2004 मध्ये काढली होती. त्यानंतर ही टोल वाढ करण्यात येत आहे.

या आधी 01 एप्रिल 2020 रोजी टोलमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील वर्षी 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढणार आहेत. मात्र 01  एप्रिल 2023 पासून लागू होणारे टोलचे दर 2030 पर्यंत कायम राहणार आहेत असेही सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितलं आहे.

Nagpur-Mumbai Super Express वर Toll Counter
मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग 701 किमी लांबीचा आणि 6 लेनचा महामार्ग आहे. गरज भासल्यास ती 8 लेनपर्यंत वाढवता येईल. याची रचना 150 किमी प्रतितास या टॉप स्पीडसाठी करण्यात आली आहे. मात्र, या द्रुतगती मार्गावर या वेगाने वाहन चालवल्यास टोल टॅक्सही भरावा लागणार आहे.  यासाठी येथे 26 टोल टॅक्स काउंटर उभारण्यात आले आहेत.

Nagpur-Mumbai Superfast Expressway Toll: toll on Samriddhi Highway

Rs 1.73 toll per kilometer for four-wheelers

Nagpur : Four-wheelers traveling 701 km Mumbai-Nagpur on the Samriddhi Highway will have to pay a toll of around Rs 1200.  The first phase of Samriddhi Highway will be inaugurated soon.  After that, the distance of 701 km from Mumbai to Nagpur can be covered at high speed.  However, the official data has come out regarding the exact amount of toll that the vehicles will have to pay on this highway.
 A board giving information about Samriddhi Highway toll has been installed on the side of the highway.  The exact amount of toll for all types of vehicles has been given on that board.  It has also been mentioned on this board that the toll rates will be applicable till March 31, 2025 i.e. for the next 3 years.  A toll of Rs 1.73 per kilometer will be collected for four-wheelers traveling on the highway.
 Traveling on the Mumbai Pune Expressway is also going to be expensive now.  The toll on the Mumbai Pune Expressway will increase by 18 percent.  This increase will be from 1st April 2023.  So now those traveling on Mumbai Pune Expressway will have to pay more toll.  In 2004, the Public Works Department (MSRDC) had suggested that the toll of the Mumbai Pune Expressway would be increased by 18 percent every three years.  After this toll is being increased.
 Earlier, the toll was increased on 01 April 2020.  After that, the toll rates will increase from April 1 next year.  However, the Public Works Department has also said that the toll rates applicable from April 1, 2023 will remain unchanged till 2030.
 The Mumbai-Nagpur Expressway is a 701 km long 6 lane highway.  It can be extended to 8 lanes if required.  It is designed for a top speed of 150 kmph.  However, toll tax will also have to be paid if the vehicle is driven at this speed on this expressway.  For this, 26 toll tax counters have been set up here.