१७ सप्टेंबरला स्वच्छतेचा जागर करणार चंद्रपूर शहरातील युवक, इंडियन स्वच्छता लीगमध्ये चंद्रपूर शहराचा सहभागशहराच्या टीमचे नाव 'हार्ट ऑफ चांदा' The youth of Chandrapur city will hold a cleanliness drive on September 17, Chandrapur city will participate in the Indian Cleanliness League, the team name of the city will be 'Heart of Chanda'

🔹१७ सप्टेंबरला स्वच्छतेचा जागर करणार चंद्रपूर शहरातील युवक

🔹इंडियन स्वच्छता लीगमध्ये चंद्रपूर शहराचा सहभाग
शहराच्या टीमचे नाव 'हार्ट ऑफ चांदा'  

चंद्रपूर १४ सप्टेंबर - केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्याच्या कालावधीत स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये “इंडियन स्वच्छता लीग” हा स्वच्छता विषयक देशव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १७ सप्टेंबर रोजी " युथ स्वच्छता रॅलीचे " आयोजन करण्यात आले आहे.

सदर रॅली ३ ठिकाणांवरून निघणार असुन रामाळा तलाव, पठाणपुरा दरवाजा, महाकाली मंदिर येथील परीसराची स्वच्छता करून गांधी चौक येथे येणार आहे. रॅलीत स्वयंसेवी संस्था,महिला बचत गट,मनपा अधिकारी कर्मचारी यांच्यासोबतच महाविद्यालयीन युवकांचा मोठया प्रमाणात सहभाग असणार आहे.  तिन्ही रॅली गांधी चौक येथे एकत्र येणार असुन स्वच्छतेचा मोठा कार्यक्रम येथे घेतला जाणार आहे.  

केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना “इंडियन स्वच्छता लीग” हा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला असून त्यामध्ये देशातील १८०० हून अधिक शहरे सहभागी होत आहेत. या अनुषंगाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये तरूणाईचा सहभाग सर्वाधिक महत्वाचा असणार आहे. यादृष्टीने कचरा विरोधात युवक (#Youth V/s Garbage) ही टॅगलाईन जाहीर करण्यात आली असून या माध्यमातून प्रत्येक शहराने आपला संघ तयार करणे व या संघाचा कर्णधार जाहीर करणे अपेक्षित आहे.

 त्यानुसार “हार्ट ऑफ चांदा” या नावाने चंद्रपूर शहरातील नागरीकांचा संघ जाहीर करण्यात येत असून टीमचा सदस्य बनण्यासाठी अधिकाधिक युवकांनी  (https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/) या  लिंकवर आपली नोंदणी करून या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

🔹 On September 17, the youth of Chandrapur city will hold a cleanliness drive

 🔹Participation of Chandrapur city in Indian Cleanliness League
 City team named 'Heart of Chanda'

 Chandrapur September 14 - According to the guidelines of the Central Government, Swachhta Amrit Mahotsav is being celebrated during the fortnight from 17th September to 2nd October and in this, a nationwide initiative on cleanliness "Indian Swachhta League" is being implemented.  Accordingly, "Youth Cleanliness Rally" has been organized by Chandrapur Municipal Corporation on September 17.

 The rally will start from 3 places and will come to Gandhi Chowk after cleaning the premises of Ramala Lake, Pathanpura Darwaza, Mahakali Mandir.  A large number of college youths will be participating in the rally along with NGOs, women's self-help groups, municipal officials and employees.  All the three rallies will converge at Gandhi Chowk and a big cleanliness drive will be held here.

 The Urban Development Department of the Central Government has announced a national initiative "Indian Swachhta League" while celebrating the nectar of cleanliness, in which more than 1800 cities of the country are participating.  In accordance with this, various activities related to cleanliness will be implemented in the fortnight from 17th September to 2nd October.  Youth participation will be most important in this.  In this regard, the tagline "Youth V/s Garbage" has been announced and through this, each city is expected to form its own team and announce the captain of this team.

  According to this, a team of citizens of Chandrapur city is being announced under the name "Heart of Chanda" and the administration of Chandrapur Municipal Corporation appeals to more and more youths to register themselves on this link (https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/) and participate in this cleanliness campaign to become a member of the team.  has done