राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्य नरेशबाबू पुगलिया च्या वतीने 13 टी.बी. रुग्णाला 1 वर्षाकरीता दत्तक घेतले, जिवनावश्यक वस्तूच्या किट्सचे वाटप, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा उपक्रम #Nareshbabu-Puglia #Mahatma-Gandhi's-Birth-Anniversary #TP #Distribution-of-essential-kits #Vidarbha-Kisan-Mazdoor-Congress

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्य नरेशबाबू पुगलिया च्या वतीने 13 टी.बी.  रुग्णाला 1 वर्षाकरीता दत्तक घेतले

जिवनावश्यक वस्तूच्या किट्सचे वाटप

विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चा उपक्रम

चंद्रपूर: विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या सुयोग्य मार्गदर्शनात व युवा नेता राहूलबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात आज रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी विश्ववंदनिय महात्मा गांधी यांची 153 वी जयंती साजरी करण्यात आली.
सकाळी 11.00 वाजता स्थानिय गांधी चौकातील कार्यालयातून शेकडो कार्यकत्यांसह गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ महात्मा गांधी की जय" असे नारे लावत रैली काढण्यात आली. राहूलबाबू पुगलिया, गजाननराव गावंडे, अशोक नागापूरे, देवेद्र बेले, रत्नमालाताई बावणे, अनिता बोबडे यांनी गांधीजींच्या पुतळ्याला मालार्पण केले.
केंद्र व राज्य शासनामार्फत राष्ट्रीय धोरणाअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत हे उदिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम राबवित आहे. याला अनुसरून केंद्रीय क्षयरोग विभागाने Community Support To TB Patient च्या अंतर्गत उपचाराखालील क्षयरुग्णांना पोषण आहार पुरवठा करावयाचा असतो. सामजिक दायित्व म्हणून नरेशबाबू पुगलिया यांनी क्षयरूग्णांना पोषण आहार पुरवठा करण्याच्या उदिष्टाने 13 रुग्णांना एक महिना पुरेल एवढे धान्य व किरानायुक्त किट्सचे वाटप एक वर्षभर करण्याची जबाबदारी उचलली व 2 ऑक्टोबर हे गांधी जयंतीचे औचित्य साधून आजच नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते 13 रुग्णांना किट्स वाटप करून सामाजिक दायित्याचा पहिला वाटा देण्यात आला.
याप्रसंगी नरेशबाबू पुगलिया हे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की केंद्र व राज्य सरकार सन 2025 पर्यंत भारत देशातून क्षयरोगाची पूर्णतः निर्मूलण करण्याचा उपक्रम राबवित आहे. त्या उदिष्टांच्या पूर्तीसाठी शासनाने जनजागृतीद्वारे जनतेला व सेवाभावी संस्थांना आवाहन केलेले आहे की, या उपक्रमात प्रत्येक नागरीकांचा वाटा असावा ते पुढे म्हणाले भारतात प्रति लाख 200 क्षय रूग्ण आहेत. या योजनेअंतर्गत प्रतिरुग्ण रू. 500/- प्रमाणे सानुग्रह अनुदान रुग्णांना शासन देत आहे. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणिव ठेऊन दानशुर व एनजीओ यांनी ही या मानवोचित राष्ट्रीय कार्यात योगदान दयावे असे आवाहन बाबुजींनी केले या आवाहनाला अनुकूल कृतिशिलता स्वीकारून आजच्या गांधी जयंतीच्या शुभमूहूतावर विदर्भ किसान मजूदर कॉंग्रेस शहर व जिल्हा चंद्रपूर तर्फे नरेशबाबू पुगलिया, राहूल पुगलिया, गजानन गावडे, देवेंद्र बेले, अशोक नागापूरे यांच्या तर्फे प्रत्येकी एक क्षयरुग्ण असे एकूण 13 रुग्ण दत्तक घेतले व त्यांना पोषण आहाराचे किट्स (तांदूळ, तूरडाळ, खाद्यतेल, चनादाळ, शेंगदाना, मूगदाळ, राजगीरा, मोट, गूळ समावेष असलेले ) वाटप करून शुभारंभ करण्यात आला आणि अशा प्रकारच्या पोषण आहाराचे किट्स रुग्णांना दरमहा वर्षभर (देण्यात येईल अशाच प्रकारच्या सामाजिक दायित्वाची जाणिव ठेऊन समाजसेवक दानशूर व एनजिओ यांनी उपक्रमात सहभाग दयावा. हिच राष्ट्रपिता महात्मा गाधीजींना आदरांजली ठरेल.
याप्रसंगी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जिल्हा चंद्रपूरचे डॉ. प्रकाश साठे जिल्हा क्षयरोग अधिकारी चंद्रपूर किशोर माणूसमारे जिल्हा समन्वयक चंद्रपूर, हेमंत महाजन वरीष्ट उपचार पर्यवेक्षक चंद्रपूर, अमोल जगताप टी.बी. हेल्थ विजीटर चंद्रपूर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे  नगरपरीषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण बुरडकर, माजी नगरसेवक विनोद पिंपळशेंडे, माजी नगरसेविका रत्नमालाताई बावणे, श्रीनिवास पारनंदी, कामगार नेते तारासिंग कल्सी, गजानन दिवसे, अनिल तुंगीडवार, राजेंद्र शुक्ला, सुदर्शन पुल्ली, विश्वास जोगी, अनिता बोबडे, चंद्रपूर सेवादलाच्या अध्यक्षा स्वाती त्रिवेदी, सायरा बानो, निर्मला ठाकूर, सिमा चव्हाण, ममता सुरतेकर, काँग्रेसचे सुधाकरसिंग गौर, बाबूलाल करुणाकर, अनंता हूड, रतन शिलावार, पृथ्वी जंगम, अजय महाडोळे, रेहान शेख, धिरज सिंग, क्रिष्णा यादव, प्रशांत घाटे, भारत जंगम, सागर पोहनकर, रमेश येलपूला, बदरूद्दीन तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Ex MP Nareshbabu Puglia on the occasion of Mahatma Gandhi's birth anniversary

 13 T.B.  Adoption of patient for 1 year

 distribution of essential kits, 

initiative of Vidarbha Kisan Mazdoor Congress

Chandrapur: On behalf of Vidarbha Kisan Mazdoor Congress District Chandrapur, the 153rd birth anniversary of Mahatma Gandhi was celebrated on Sunday, October 2, 2022 under the guidance of senior Congress leader and former MP Nareshbabu Puglia and under the leadership of youth leader Rahul Babu Puglia.
 At 11.00 am, a rally was taken out from the local Gandhi Chowk office along with hundreds of workers near the statue of Mahatma Gandhi in Gandhi Chowk shouting "Mahatma Gandhi Ki Jai".  .
 Central and State Governments are implementing programs to achieve the target of Tuberculosis Free India by 2025 under the National Policy.  According to this, the Central Tuberculosis Department has to provide nutritional food to the TB patients under treatment under Community Support To TB Patient.  As a social responsibility, Nareshbabu Puglia took the responsibility of distributing food and grocery kits sufficient for 13 patients for one month for one year with the aim of providing nutritional food to tuberculosis patients and on the occasion of Gandhi Jayanti on 2nd October today, Nareshbabu Puglia distributed kits to 13 patients for the first share of social responsibility.  was given
 On this occasion, Nareshbabu Puglia, while expressing his thoughts, said that the Central and State Governments are implementing an initiative to completely eliminate tuberculosis from India by the year 2025.  For the fulfillment of those goals, the government has appealed to the public and charitable organizations through public awareness that every citizen should have a share in this initiative, he added that there are 200 tuberculosis patients per lakh in India.  Under this scheme per patient Rs.  500/- is being given by the government to the patients.  Babuji appealed to Danshur and NGOs to contribute to this philanthropic national work by keeping a sense of social responsibility.