महाराष्ट्र राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, रविंद्रसिंग परदेशी चंद्रपूरचे नवे पोलिस अधिक्षक Transfer of 24 Police Officers in Maharashtra State, Rabindra Singh Pardeshi new Superintendent of Police Chandrapur

🔹 महाराष्ट्र राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या  बदल्या 

🔹 रविंद्रसिंग परदेशी चंद्रपूरचे नवे पोलिस अधिक्षक

मुंबई : दिवाळीपूर्वी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये उप आयुक्त तसेच पोलिस अधिक्षक पदाच्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आज सायंकाळी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

▪️पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखांची बदली झाली आहे.

▪️अंकित गोयल आता पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक आहेत.

▪️पोलीस उपायुक्त निलोत्पल यांची गडचिरोली पोलीस अधीक्षकपदावर बदली झाली आहे.

➡️ परभणीत महिला राज पहायला मिळाले आहे. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तां नंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षक ही महिलाच झाल्या आहेत.

▪️रागसुधा आर परभणीच्या नवीन पोलीस अधीक्षक आहेत. पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची बदली झाली आहे. रागसुधा आर ह्या, यापूर्वीही सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून परभणीत आल्या होत्या.

▪️सांगली पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांचीही बदली झाली आहे. बसवराज तेली सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक आहेत.

▪️नागपूर पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांची बुलडाणा पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. 

▪️मुबंईच्या राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असलेले रविंद्रसिंग परदेशी यांची चंद्रपूरच्या पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
🔹 Transfers of 24 police officers in Maharashtra state

 🔹 Ravindra Singh Pardeshi is the new superintendent of police of Chandrapur

 Mumbai: Maharashtra government has taken a big decision before Diwali.  24 police officers in Maharashtra state have been transferred in haste.  The transferred officers include Deputy Commissioner as well as police officers of the rank of Superintendent of Police.

 Police officers from many cities including Mumbai, Thane, Pune, Nagpur are included.  The transfer orders of officers were issued this evening.

 Pune Rural Superintendent of Police Dr.  Abhinav Deshmukh has been transferred.

 ▪️Ankit Goyal is now the new Superintendent of Police of Pune Rural.

 ▪️Deputy Commissioner of Police Nilotpal has been transferred to the post of Gadchiroli Superintendent of Police.

 ➡️ Mahila Raj has been seen in Parbhani.  After the Collector, Municipal Commissioner, now the District Superintendent of Police has become a woman.

 ▪️Ragasudha R is the new Superintendent of Police of Parbhani.  Superintendent of Police Jayant Meena has been transferred.  Ragasudha R had earlier also come to Parbhani as Assistant District Superintendent of Police.

 ▪️Sangli Superintendent of Police Dixit Gedam has also been transferred.  Basavaraj Teli is the new Superintendent of Police of Sangli.

 Nagpur Deputy Commissioner of Police Sarang Awad has been appointed as Buldana Police Commissioner.

 ▪️Ravindra Singh Pardeshi, who is working in the State Intelligence Department of Mumbai, has been appointed as Superintendent of Police, Chandrapur.