६० कोटी रू. किेंमतीच्‍या महाकाली मंदिर परिसराच्या विकास प्रकल्‍पाला लवकरच सुरूवात होणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित 60 crore Rs. Keenmati Mahakali temple complex development project to start soon, thanks to Guardian Minister Sudhir Mungantiwar's efforts

🔹६० कोटी रू. किेंमतीच्‍या महाकाली मंदिर परिसराच्या विकास प्रकल्‍पाला लवकरच सुरूवात होणार

🔹पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 15 ऑक्टोबर : चंद्रपूरचे आराध्‍य दैवत माता महाकाली मंदीराशी संबंधित विकासकामांचे कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलस्वरूप ६० कोटी रु. किमतीच्या या विकास प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे. या संदर्भात पुरातत्व विभागाची परवानगी देखील पालकमंत्री श्री. मुनगंटीवार लवकरच प्राप्त करणार आहेत.

अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात श्री महाकाली मंदीर देवस्‍थान परिसराच्‍या विकासासाठी श्री. मुनगंटीवार यांनी ६० कोटी रू. निधी मंजूर करून घेतला होता. गोंडकालीन इतिहासाची साक्ष देणा-या विदर्भातील अष्‍टशक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महाकाली मंदीर परिसराच्‍या विकासासाठी दिनांक १९ सप्‍टेंबर २०१९ च्‍या नगरविकास विभागाच्‍या शासन निर्णयान्‍वये मान्‍यता देण्‍यात आली आहे. महाकाली मंदीर विकास कार्यक्रमाअंतर्गत गोंडकालीन स्‍थापत्‍य व शिल्‍पकला जपून त्‍याचाच आधार घेवून दोन टप्‍प्‍यात विकास आराखडा तयार करण्‍यात आला आहे.

🔹 टप्‍पा-१ अंतर्गत धर्मशाळा इमारत, स्‍वयंपाक घर, भाविकांसाठी दर्शन रांगा, दुकाने, मुख्‍य प्रवेशद्वाराचे बांधकाम, फ्लॅग पोस्‍ट, मंडप परिसराचा विकास, मुख्‍य प्रवेशद्वारावर शिल्‍पकला तयार करणे, संरक्षण भिंत तसेच अस्‍तीत्‍वात सोयीसुविधांची पुर्नबांधणी करणे या गोंष्‍टींचा अ₹समावेश आहे. यासाठी मंजूर ६० कोटी रु निधी डिपॉझिट झाल्याने कामामध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

🔹टप्‍पा –२ अंतर्गत अतिविशिष्‍ट व्‍यक्‍तींकरिता प्रवेशद्वार, माता महाकालीची ८० फुट उंच मूर्ती, दीपस्‍तंभ, संग्रहालय, घाट परिसराचा विकास, मनोरे, मंदीर परिसराचा विकास या बाबींचा समावेश आहे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाच्‍या काळात चंद्रपूरच्‍या या आराध्‍य दैवताच्‍या मंदिर परिसराच्‍या विकासासाठी घेतलेला पुढाकार आता मुर्त स्‍वरूपात साकार होत आहे. लवकरच या कामाला सुरुवात  होणार असून चंद्रपूरकरांच्‍या श्रध्‍देशी निगडीत हा प्रकल्‍प मार्गी लागणार आहे.

■ 60 crore Rs.  Keenmati Mahakali temple complex development project to start soon

 🔹Palak Minister Sudhir Mungantiwar's efforts are the result

 #Loktantrakiawaaz
 Chandrapur, Dt.  October 15: Commencement order for the development works related to Aradhya Daiwat Mata Mahakali Mandira of Chandrapur has been issued and as a result of the efforts of Guardian Minister Sudhir Mungantiwar, Rs.  This expensive development project will start soon.  In this regard, the permission of the Department of Archeology is also given by the Guardian Minister Shri.  Mungantiwar will receive soon.

 For the development of Shri Mahakali Mandir Devasthan premises during the tenure of Finance Minister Shri.  60 crores by Mungantiwar.  The funds were approved.  Development of Shree Mahakali Mandir premises, which is one of the Asht Shaktipiths of Vidarbha, which bears witness to the history of the Gond period, has been approved by the Government decision of the Urban Development Department dated 19 September 2019.  Under the Mahakali Temple Development Programme, a two-phase development plan has been prepared by preserving the Gond period architecture and architecture.

 🔹 Phase-1 includes Dharamshala building, cooking house, darshan queue for devotees, shops, construction of main entrance, flag post, development of mandap area, construction of Shilpak at main entrance, protection wall and reconstruction of existing facilities.  There will be no problem in the work due to the sanctioned fund deposit of Rs 60 crore for this purpose.

 🔹Phase-2 includes entrance for VIPs, 80 feet tall idol of Mother Mahakali, lamp post, museum, development of ghat area, towers, development of temple area.

 The initiative taken by Guardian Minister Sudhir Mungantiwar during his tenure as Finance Minister for the development of the temple area of ​​this adorable deity of Chandrapur is now being realized in tangible form.  Soon this work will start and this project related to Chandrapurkar's Shraddeshi will be launched.