चंद्रपुर शहर महानगर पालिका स्थापना दिनानिमित्त माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा, बारा वर्षाच्या कालावधीत चंद्रपुर महानगरपालिकेकडून विविध लोकोपयोगी विकासकामे पूर्णत्वास - आयुक्त विपिन पालीवाल cmc Chandrapur City Metropolitan Municipality Establishment Dayanimitt Maji Padmadhikayancha Sohla, Bara Varshachaya Kalavadhit Chandrapur Mahanagarpalikadoon Miscellaneous Public Utilities Development Work Completion - Commissioner Vipin Paliwal

❇️ चंद्रपुर शहर महानगर पालिका स्थापना दिनानिमित्त माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा

❇️ बारा वर्षाच्या कालावधीत चंद्रपुर महानगरपालिकेकडून विविध लोकोपयोगी विकासकामे पूर्णत्वास - आयुक्त विपिन पालीवाल

❇️ आयुक्तांच्या हस्ते तक्रार निवारण ॲपचा शुभारंभ

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. २५ ऑक्टोबर: 25 ऑक्टोबर 2011 रोजी नगरपालिका संपुष्टात येऊन चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत 12 वर्ष पूर्ण झाली. 2011 ते 2022 या कालावधीत चंद्रपूर महानगरपालिकेने विविध लोकोपयोगी कामे केली असून अनेक विकासकामे करण्यात आली आहे. यापुढेही ही विकासकामे निरंतर सुरू राहील, अशी ग्वाही महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विपिन पालीवाल यांनी दिली.

महानगरपालिकेच्या स्थापना दिनानिमित्त माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा पालिकेतील राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी, माजी महापौर सर्वश्री राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर, संगीता अमृतकर, उपायुक्त अशोक गराटे तसेच विविध विभागाचे अधिकारी व महानगरपालिकेचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

शासनाच्या आदेशान्वये पालिका स्थापना दिवस साजरा करण्याच्या सूचना होत्या असे सांगून आयुक्त श्री. पालीवाल म्हणाले, महानगरपालिकेचा हा पहिलाच स्थापना दिवस आहे, अगदी कमी कालावधीत या स्थापना दिवसाचे नियोजन करण्यात आले, यापुढे हा स्थापना दिवस अधिक चांगल्या पद्धतीने आयोजित करू. 

नागरिकांच्या तक्रार सोडविण्यासाठी आणि तक्रारीच्या निराकरणासाठी तक्रार निवारण ॲप सुरू करण्यात आली आहे. तक्रार ऑनलाइन करता यावी यासाठी हे ॲप महत्त्वपूर्ण ठरेल. यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 2574 010 व व्हाट्सअप क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहे. सदर तक्रार फोटोसहीत ॲपवर नोंदवावी,सदर तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल. व त्या तक्रारीची दखल त्या विभागाकडून घेण्यात येईल.
चंद्रपुर शहरात 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता लीग सुरू करण्यात येत आहे, याद्वारे वर्दळ असलेल्या जागेची स्वच्छता, वृक्ष लागवड, पेंटिंग, लोकसहभागाच्या माध्यमातून श्रमदान करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. चंद्रपुरात राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये एकोपा असून या काळामध्ये शहरात चांगली कामे झाली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी माजी महापौर अंजली घोटेकर म्हणाल्या, 25 ऑक्टोबर 2011 रोजी नगरपालिका बरखास्त करून महानगरपालिकेचे निर्मिती झाली. चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा विकास करण्याचा ध्यास सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घेतला. मी महापौर असताना राणी हिराई सभागृहाचे नामकरण करण्यात आले. चंद्रपूर ही माता महाकाली ची ऐतिहासिक नगरी आहे, त्यामुळे चार वेळा महानगरपालिकेवर महिलांचे राज्य राहिले.

माजी महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या, चंद्रपुर शहरात उत्तम व नाविन्यपूर्ण अशी कामे झाली, कामे करतानाच त्या कामांचे मेंटेनन्स सुद्धा होणे गरजेचे आहे. नागरिकांनी शहराचे सौंदर्य, स्वच्छता व हिरवळता जपावी. शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी खुल्या जागेवर उद्यानाची कामे झाली. यापुढेही अशी कामे पूर्णत्वास येईल. त्यासोबतच चंद्रपूर शहर हिरव कसं करता येईल याचा सर्वांनी प्रयत्न करावा असेही त्या म्हणाल्या.

चंद्रपुर शहरात अमृत योजनेअंतर्गत जी कामे पूर्णत्वास येत आहे ती लवकर व्हावी. असे प्रथम माजी महापौर संगीता अमृतकर म्हणाल्या.

कार्यक्रमाचे संचालन मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत  तर आभार अनिल घुले यांनी मानले.

#Loktantrakiaeaaz
Chandrapur, Dt.  25 October: On 25 October 2011, the municipality was dissolved and Chandrapur Municipal Corporation was formed.  It has completed 12 years since its inception.  During the period from 2011 to 2022, Chandrapur Municipal Corporation has done various public utility works and many development works have been done.  Municipal Commissioner and Administrator Vipin Paliwal assured that these development works will continue continuously.

 On the occasion of the foundation day of the Municipal Corporation, the felicitation ceremony of the former office bearers was organized in the Rani Hirai Auditorium of the Corporation. He was speaking on this occasion.

 On this occasion, former mayor Sarveshree Rakhi Kancharlawar, Anjali Ghotekar, Sangita Amritkar, Deputy Commissioner Ashok Garate and various department officials and municipal employees were mainly present.

 Commissioner Shri saying that there were instructions to celebrate the establishment day of the municipality as per the order of the government.  Paliwal said, this is the first foundation day of the municipal corporation, this foundation day was planned in a very short time, henceforth we will organize this foundation day in a better way.

 Grievance redressal app has been launched to resolve citizen's grievances and redressal of grievances.  This app will be important to make complaints online.  Toll free number 1800 2574 010 and WhatsApp number have been activated for this.  The said complaint should be registered on the app along with the photo, the said complaint will be sent to the concerned department.  And that complaint will be taken into consideration by that department.

 Swachhta League is being started in Chandrapur city from 1st to 30th November, through this, cleanliness of crowded places, tree planting, painting, labor donation will be done through public participation.  For this, citizens should spontaneously participate in this competition.  He said that there is harmony among the political office bearers in Chandrapur and good works have been done in the city during this time.