जनआंदोलन छेडण्याचा आम आदमी पार्टीचा इशारा
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : स्वस्त धान्य दुकानदारांचे केंद्र शासनाचे सप्टेंबर २०२१ पासूनचे थकीत कमिशन व राज्य शासनाचे माहे मे २०२१ चे कमिशन थकीत आहेत. आता दिवाळी तोंडावर आहे. मात्र, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कमीशनखोरीमुळे स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशन मिळण्यास विलंब होत आहे. हि बाब अतिशय गंभीर असून, तात्काळ कमिशन अदा करण्यात यावे, अन्यथा याविरुद्ध जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना सोबत घेऊन जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने व राज्य सरकारद्वारे मोफत धान्य वाटप यंत्रणा स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत राबविली जाते. मात्र या योजनेच्या थकीत कमिशनमुळे स्वस्त धान्य दुकानदारांची दिवाळी अंधकारमय होण्याची शक्यता आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता युद्ध पातळीवर कार्य केले. सामाजिक जाणीव ठेऊन केलेले हे त्यांचे कार्य उल्लेखनिय आहे.
शासनाने सर्वांची दिवाळी गोडपणे साजरी होण्यासाठी दिवाळी धान्य किट वितरण करण्याची यंत्रणा सुद्धा स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून करण्याची घोषणा केली. पण स्वस्त धान्य दुकानदारांच्या दिवाळीचे काय? लोकांची दिवाळी गोड करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर अन्याय होत आहे. थकीत वेतन न मिळाल्यामुळे दिवाळी अंधकारमय जाण्याची शक्यता आहे. नविन दिवाळी कीट फक्त मूल तालुका वगळता कुठेही देण्यात आलेली नाही.
दिवाळी तिनं दिवसांवर आली असताना सुद्धा जनतेला वाटप न होने हि गंभीर बाब आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबत निष्पक्ष चौकशी करून शासनाद्वारे जमा केलेला निधी भ्रष्टाचार न करता वाटप करावा.
या प्रकरणाची योग्य चौकशी करुन स्वस्त धान्य दुकानदारांना थकीत वेतन तात्काळ द्यावे, अन्यथा याविरुद्ध जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, शहर सचिव राजु कुडे, घुग्गुस शहराध्यक्ष अमीत बोरकर, शहर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, झोन अध्यक्ष रहेमान खान, वार्ड अध्यक्ष पवन प्रसाद, तथा ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
If only the cheap grain shopkeepers will starve, what will serve the public - Sunil Musale
Aam Aadmi Party warns of mass agitation
#Loktantrakiawaaz
Chandrapur: The arrears of central government commission from September 2021 and state government commission for the month of May 2021 of the cheap grain shopkeepers are outstanding. Now Diwali is approaching. However, due to the commission of the District Supply Officer, there is a delay in getting the commission to the cheap grain shopkeepers. Aam Aadmi Party District President Sunil Musale has warned that this matter is very serious and the commission should be paid immediately, otherwise a public agitation will be launched against this by taking all the cheap grain shopkeepers along with them.
The free food grain distribution system is implemented by the central government and the state government through cheap grain shopkeepers. But due to the outstanding commission of this scheme, the Diwali of the cheap grain shopkeepers is likely to be dark. Shopkeepers of cheap grains worked on war level during Corona period without caring for their lives. His work with social awareness is remarkable.
The government also announced the system of distribution of Diwali grain kits through cheap grain shopkeepers so that everyone can celebrate Diwali sweetly. But what about the Diwali of cheap grain sellers? Injustice is being done to the cheap grain shopkeepers who sweeten people's Diwali. Due to non-payment of dues, Diwali is likely to go dark. New Diwali kit is not given anywhere except Mool Taluka.
Even when Diwali is approaching, it is a serious matter that the public is not distributed. The District Collector should make an impartial inquiry in this regard and distribute the funds collected by the government without corruption.
The Aam Aadmi Party has warned that the matter should be properly investigated and the arrears should be paid immediately to the cheap grain shopkeepers, otherwise there will be mass agitation against it.
District President Sunil Devrao Musale Youth District President on this occasion Mayur Raikwar, City Secretary Raju Kude, Ghuggus City President Amit Borkar, City Youth President Santosh Bopche, Zone President Rahman Khan, Ward President Pawan Prasad and many other office bearers were present.