निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर Major Decision of Election Commission: The Uddhav Thackeray group released a poster of Shiv Sena's new name

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय:

उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर

#Loktantrakiawaaz
मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले. दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही. शिवसेना हे पक्षाचे नाव देखील लावता येणार नाही असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. यानंतर आता निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत मोठा निर्णय दिला. यानंतर ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळालं आहे.
चिन्हाबाबतही निवडणुक आयोगाने निर्णय दिला आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह  देण्यात आले आहे. तर, चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत.
निवडणुक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.  ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर केले आहे.
या पोस्टरवर ठाकरे गटाचे शिवसेनेचे मशाल हे नवे चिन्ह दिसत आहे. तसेच ठाकरे गटाच्या पक्षाचे नवे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’  हे दखील दिसत आहे.
अंधेरी पोट निवडणुकीत ठाकरे गट हेच नाव आणइ हेच चिन्ह वापरणार आहे.  शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील मशालीसह फोटो शेअर केला आहे.

Major Decision of Election Commission:

 The Uddhav Thackeray group released a poster of Shiv Sena's new name

#Loktantrakiawaaz
Mumbai: The Election Commission has frozen Shiv Sena's bow and arrow symbol.  Neither group can use the bow and arrow symbol.  The Election Commission had directed that Shiv Sena cannot even be named as a party.  After this, the Election Commission has given a big decision regarding the symbol and name of the Shiv Sena party.  After this, the Thackeray group has announced a poster of Shiv Sena with its new name.

 The Thackeray group has got the name 'Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray'.  So, the Shinde group got the name Shiv Sena of Balasaheb.

 The Election Commission has also given a decision regarding the symbol.  The Thackeray group has been given the symbol of Mashal.  So, the Election Commission has ordered the Shinde group to suggest alternatives for the symbol.

 After the Election Commission's decision on the name and symbol of the party, there is an atmosphere of excitement in the Thackeray group.  The Thackeray group has released a poster of Shiv Sena's new name and symbol.

 The Shiv Sena's torch, the new symbol of the Thackeray group, is seen on this poster.  Also, the new name of the party of the Thackeray group is 'Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray'.

 The Thackeray group will use the same name and the same symbol in the Andheri pot elections.  Shiv Sena leader Neelam Gorhe also shared a photo with Mashali.