विसापुर येथील हनुमान मूर्ति तोड़फोड़ प्रकारण्यातील आरोपिस पोलिसांनी घेतले ताब्यात The accused of vandalizing the Hanuman idol in Visapur have been taken into custody by the police

विसापुर येथील हनुमान मूर्ति तोड़फोड़ प्रकारण्यातील आरोपिस पोलिसांनी घेतले ताब्यात

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर :- बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बल्लारपुर ते चंद्रपूर रोडवरील भिवकुंड गावाच्या लगत रोडच्या बाजुला असलेल्या हनुमान मंदीरातील मुर्तीची कोणीतरी अज्ञात इसमाने तोडफोड करून अवहेलना केल्याची घटना दिनांक 23/11/2022 चे रात्रीच्या वेळी घडली. सदर घटनेबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशन अप.क्र. 1128/2022 कलम 295 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. 

सदर घटना संबंधाने दिनांक 24/11/2022 चे सकाळी माहीती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग संतोषसिंग परदेशी, अपर पोलीस, अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक पोस्टे बल्लारपूर उमेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीत इसमाचा तात्काळ शोध घेण्याबाबत पोलीस निरीक्षक उमेश पाटील तसेच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना आदेशीत केले..

पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील सपोनि विकास गायकवाड यांचे सोबतच्या डिबी पथकातील अंमलदारांचे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदिप कापडे, सपोनि मंगेश भोयर यांचे सोबत स्थागुशा येथील अंमलदारांचे वेगवेगळे पथक तयार करून अज्ञात आरोपीची शोध मोहीम चालु केली.

सदर गुन्हा करण्याच्या पध्दतीचे अवलोकन केले असता सदर मुर्तीची तोडफोड ही कोणीतरी मनोरूग्न व्यक्तीने केली असावी असे सकृतदर्शनी दिसुन येत असल्याने त्या दृष्टीने शोध मोहीम चालु केली. सदर घटनास्थळावरून चारही दिशेला जाणारे वेगवेगळया रोडवरील रेल्वेस्थानके, बस स्थानक, धाबे व वर्दळीच्या ठिकाणी शोध मोहीम चालु केली. दिनांक 24/11/2022 रोजी सदर शोध मोहीमे दरम्यान पोस्टे बल्लारपूर चे सपोनि गायकवाड व त्यांच्या पथकाला गोंडपिपरी रोड वर बल्लारपूर पासुन 35 ते 40 कि.मी. चे अंतरावर रात्रीच्या वेळी रोडने एक संशयीत इसम जातांना दिसुन आला. सदर पथकाने त्यास ताब्यात घेतले त्या वेळी त्याचे हाताला व कपडयांना मुर्तीला असलेले तेल मिश्रीत शेंदुर लागल्याचे दिसुन आले. त्यामुळे सदर इसमानेच तोडफोड केल्याची खात्री पटली त्याचेकडे चौकशी केली असता त्याने मुर्तीची तोडफोड केल्याचे कबुल केले. अधिक चौकशी मध्ये तो नागपूर येथील रहीवाशी असल्याचे व तो मागील एक महीण्यापासुन घरामधुन निघुन असाच भटकंती करत असल्याचे दिसुन आले आहे. सकृतदर्शनी सदर इसम हा मनोरुग्न असल्याचे दिसुन येत असुन त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंग संतोषसिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधु उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजा पवार यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थागुशा चंद्रपूर, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि विकास गायकवाड, सपोनि रमीज मुलानी, स. फौ. सलीम शेख, पो. हवा. आनंद परचाके, सुधाकर वरघने, सतिष पाटील, लेकेश नायडू, ना.पो.कॉ. सत्यवान कोटनाके, पो. कॉ. शेखर मातनकर, दिलीप आदे श्रीनिवास वाभिटकर, प्रसन्ना, मपोकॉ. सिमा पोरते, चालक ढवस पोस्टे बल्लारपूर यांनी केली असून पुढील तपास पो. नि. उमेश पाटील हे करीत आहेत.

The accused of vandalizing the Hanuman idol in Visapur have been taken into custody by the police

#Loktantrakiawaaz

 Chandrapur :- In the night of 23/11/2022, the idol of Hanuman Mandir located on the side of road adjacent to Bhivkund village on Ballarpur police station limits was vandalized by an unknown person.  Regarding the said incident, Ballarpur Police Station Up.No.  1128/2022 Section 295 I.D.V.  A case was registered under

 As soon as the information regarding the said incident was received in the morning of 24/11/2022 keeping in mind the seriousness of the incident, Superintendent of Police Ravindra Singh Santosh Singh Pardeshi, Additional Police, Superintendent Mrs. Rina Janbandhu, Sub Divisional Police Officer Raja Pawar, Police Inspector Local Crime Branch Balasaheb Khade, Police Inspector Post Ballarpur  Umesh Patil immediately visited the spot.  After that, Superintendent of Police, Chandrapur ordered Police Inspector Umesh Patil and Police Inspector Balasaheb Khade to immediately search for Isma among the unknown accused in the said crime.

As per the order given by the Superintendent of Police, Chandrapur, Police Inspector Umesh Patil led by Police Inspector Vikas Gaikwad from Police Station Ballarpur along with the DB team and Police Inspector Balasaheb Khade led by Police Inspector Jitendra Bobde, Police Sandeep Kapde, Police Mangesh Bhoyer along with different teams from Sthagusha.  Prepared and launched a search operation for the unknown accused.

 When observing the method of committing the said crime, it was clearly seen that the vandalism of the said idol must have been done by some mentally ill person, so a search operation was launched in that regard.  A search operation was launched at the railway station, bus station, dhaba and Vardli on different roads leading from the said incident site.  During the said search operation on 24/11/2022, Saponi Gaikwad of Poste Ballarpur and his team were found 35 to 40 km from Ballarpur on Gondpipari Road.  At a distance of , a suspicious person was seen walking along the road at night.  When the said team detained him, it was seen that his hands and clothes were stained with the oil mixed with the idol.  Therefore, it was confirmed that Sadar Isma had done the vandalism.  In further investigation, it has been found that he is a resident of Nagpur and he has been wandering like this since last one month.  It appears that Isam is mentally ill and is being thoroughly investigated.

Superintendent of Police Shri.  Rabindra Singh Santosh Singh Pardeshi, Additional Superintendent of Police Mrs. Rina Janbandhu Sub Divisional Police Officer Shri.  Under the guidance of Raja Pawar, Police Inspector Balasaheb Khade, Sthagusha Chandrapur, Police Inspector Umesh Patil, Saponi Vikas Gaikwad, Saponi Rameez Mulani, S.  Fr.  Salim Shaikh, P.O.  the air  Anand Parchake, Sudhakar Varaghane, Satish Patil, Lakesh Naidu, N.P.O.C.  Satyawan Kotnake, P.O.  Co.  Shekhar Matankar, Dilip Ade Srinivas Wabhitkar, Prasanna, Mpoko.  Sima Porte, Driver Dhavas Poste Ballarpur has done further investigation. Thanedar Umesh Patil is doing this.

 #accused  #vandalizing  #HanumanidolinVisapur   #custody  #police #Chandrapur-Police  #Maharashtra-Police  #Bhivkund-Nala #Hanuman-Mandir  #Chandrapur-Local-Crime-Branch