आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी, मतदार यादी अचूक होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी विनय गौडा Citizens should cooperate with District Magistrate Vinay Gowda to ensure accuracy of voter registration and voter list four times a year

🔹आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी

🔹मतदार यादी अचूक होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी विनय गौडा

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर दि. 9 नोव्हेंबर : निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. 9 नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील तपासून मतदार यादी अचूक होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी पल्लवी घाटगे, नायब तहसीलदार (निवडणूक) लोकेश्वर गभणे उपस्थित होते.  
आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले,  1 जानेवारी किंवा त्याआधी  18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनाच मतदार नोंदणी करता यायची. मात्र 2023 पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत विशेष मोहिमे अंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.
9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 हा कालावधी मतदार नोंदणीचा असून एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 19  व 20 नोव्हेंबर आणि 3 व 4 डिसेंबर या दिवशी राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच वंचित घटकांसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला आणि दिव्यांग यांचे नाव नोंदणीसाठी 12 व 13 नोव्हेंबर रोजी, तर 26 व 27 नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी विशेष शिबिरे घेतली जातील. तसेच तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत. शिवाय, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा एन.व्ही.एस.पी., व्होटर पोर्टल या संकेतस्थळावर आणि व्होटर हेल्पलाईन या मोबाइल ऑपवर उपलब्ध आहेत. 
ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने 10 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल. 

मतदार नोंदणीसाठी पात्र युवकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावी. या संधीचा लाभ घेऊन प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

Citizens should cooperate with District Magistrate Vinay Gowda to ensure accuracy of voter registration and voter list four times a year

#Loktantrakiawaaz
Chandrapur Dt.  November 9 : Updating of electoral rolls is very important to conduct elections in a transparent and fair environment.  The draft list will be published on the website of the Office of the Chief Electoral Officer and in the Electoral Registration Offices on November 9.  Voters can enter their name, address, gender, date of birth, age, identity card number, constituency etc.  District Collector Vinay Gowda GC appeals to cooperate with the administration to make the voter list accurate by checking the details.  did by

 He was speaking at a press conference held at the collector's office.  Upazila Election Officer Pallavi Ghatge, Deputy Tehsildar (Election) Lokeshwar Gabhane were present on this occasion.

Until now, January 1 was the qualifying date for voter registration, Collector Shri.  Gowda said, only citizens who completed 18 years of age on or before January 1 could register as voters.  However, from 2023 onwards, citizens who turn eighteen years of age on or before a date in the months of January, April, July and October, will be able to register voters in advance under a special campaign from November 9 to December 8, 2022.

The period from November 9 to December 8, 2022 is for voter registration and objection regarding one's name.  Exclusion of ineligible voters is also important for updating electoral rolls.  On the occasion of special revision programme, special camps will be organized across the state on 19th and 20th November and 3rd and 4th December.  Also, special camps will be organized for the disadvantaged groups.  Special camps will be held on November 12 and 13 for the registration of women and persons with disabilities, and on November 26 and 27 for the registration of names of third-class citizens, women prostitutes, and homeless nomads and tribals.  Also, voter registration camps will be conducted across the state in collaboration with National Service Scheme, National Student Army, Nehru Yuva Kendra Sanghatan, Bharat Scout to reach out to young voters.  Moreover, the facilities of voter registration, deletion of name, correction of details are available on NVSP, Voter Portal website and Voter Helpline mobile app.

A special Gram Sabha will be organized on November 10 in collaboration with the Village Development and Panchayat Raj Department.  On this day, the voter list will be read in gram sabhas across the state.  Under it, newly registered citizens, women who came to the village after marriage, citizens who have settled permanently in the village will be registered.  Also, names of double names, deceased persons, persons who have permanently migrated from the village, women who have married and moved to another village will be excluded from the voter list.

Youths eligible for voter registration should register their name in the voter list, and every voter should ensure that their details in the draft voter list are correct.  Collector Vinay Gowda has appealed that everyone should take advantage of this opportunity to exercise their right to vote.