Big Breaking News: चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #Gold-Mining-in-Chandrapur #Gold-Mining-Sindhudurg-District #Gold-Mining #Chandrapur-Gold #Gold #CM-Eknath-Shinde

Big Breaking News: चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण

#Loktantrakiawaaz
मुंबई : मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सोन्याच्या खाणींबाबात केलेला उल्लेख सगळ्यांचं लक्ष वेधणारा ठरला.

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती दिली. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याबाबतच्या माहितीला दुजोरा दिला. राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आर्यन या खनिजांसोबत सोनंही असू शकतं, असं आता बोललं जातंय. याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचंही सांगितलं जातंय. या दृष्टीने आता चाचणीही सुरु करण्यात आल्याचं कळतंय.

महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक आहेत, अशी माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हे सोनं निघालं तर ती महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी असेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.  सोन्याचे हे दोन ब्लॉक विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणतील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असल्याचंही सांगितलं जातंय.

महाराष्ट्र राज्याच्या भूगर्भात जर खनिजांचा साठा आढळून आला तर देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरु केला जाऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Big Breaking News: Gold mining in Chandrapur and Sindhudurg district

#Loktantrakiawaaz
Mumbai: An Investors' Conference on Opportunities in the Mining Sector was organized at the Taj Hotel in Mumbai.  Speaking in this conference, Chief Minister Eknath Shinde's mention about gold mines in the state attracted everyone's attention.

Two districts of Maharashtra have been predicted to have gold mines.  Chief Minister Eknath Shinde himself also informed that the search work is underway in this regard.  He was speaking at an event in Mumbai.  On this occasion, he confirmed the information about existence of gold mines in Chandrapur and Sindhudurg districts of the state.  It is now being said that along with minerals such as coal, bauxite, Aryan, gold can also be present in the underground of the state.  It is also said that there is a report of the Mining Department of the Central Government in this regard.  In this regard, it is known that the test has also been started.

Chief Minister Eknath Shinde has said that the central authorities have informed that there are two blocks of gold in Maharashtra.  He also said that if this gold comes out during the Shinde-Fadnavis government, it will be a big achievement for Maharashtra.  It is also said that these two blocks of gold are located in the districts of Chandrapur in Vidarbha and Sindhudurg in Konkan.

At this time, he also expressed his belief that if mineral reserves are found in the underground of the state, then the largest steel project in the country can be started.

#Chief-Minister-Eknath-Shinde      #CM-Maharashtra                    #Vidarbh-Gold-Mining                #Konkan-Gold-Mining                #Mining -Department-Central-Government