#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 10: आपले कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा या उद्देशाने चंद्रपुर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
विविध शासकीय कामाच्या निमित्ताने नागरिकांची, अभ्यागंताची सतत येजा सुरू असते. त्यामुळे त्यांना या परिसरात आल्यावर स्वच्छ व प्रसन्न वाटावे, या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून श्रमदान करण्यात आले.
चंद्रपुर जिल्ह्यातील इतरही कार्यालयांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Donation of officers and employees in District Magistrate office area
#Loktantrakiawaaz
Chandrapur, Dt. 10 December: Collector Vinay Gowda G C along with other officers and employees donated labor and cleaned the area in the area of the Collector's office with the aim of making our office and the premises of the office look clean and beautiful.
On the occasion of various government work, citizens and visitors are constantly coming. Therefore, with the aim of making them feel clean and happy when they come to this area, labor was donated through the initiative of the District Collector.
The District Collector also appealed to other offices in the district to keep their office premises clean and beautiful.
On this occasion, Resident Deputy Collector Vishal Kumar Meshram, Sub Divisional Officer of Ballarpur Dr. Deepti Suryavanshi along with other officers and employees were present.