सम्पति ने जग मोहित होते
भागवत कथेचे पाचवे दिवस
चन्द्रपुर:- देवाला आपल्या कड़े आकर्षित करायचे असेल तर आपला स्वभाव चांगला ठेवा, संपत्ति ने जगातील लोक तुमच्या कड़े आकर्षित होऊन बघतील, परमात्मा मनुष्यच्या स्वभावाने जवळ करतो, असे प्रतिपादन श्री राधे कृष्ण महाराज यांनी केले.
भागवत कथा सेवा समिति तर्फे लोहारा येथील उज्वल गौरक्षण संस्थेला मदती साठी आयोजित केलेल्या भागवत कथेचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
महाराज पुढे म्हणाले की, समजाकड़ूँन सन्त लोकांना नेहमीच वाईट वागणूक मिळाली परन्तु त्यांनी आपल्या जन सेवेचा, जागृती चा नियम कधी सोडला नाही, ज्या प्रकारे समुद्राचे खारट पाणी घेऊन मेघराज सृष्टी ला गोड़ पाणी ची वर्षा करतो, तसेच संसारा कडून मिळणाऱ्या कटु व्यवहाराला स्वीकार करावी, पण आपण समाजाला नेहमी गोड़वा च परत करावा.
गौमाता समृद्धि चे प्रतीक
कृष्ण भगवान ने आपले बालपण व्यतीत करण्यासाठी गोकुळ निवडले ,गायी च्या मुळे त्या काळी गोकुळ समृद्व होते, आज ही गौ माता समृद्धि चे प्रतिक आहे. गौरक्षण आणि गौसंवर्धन केल्याने पुनः एकदा आपण समृद्धि वह्य वाटेवर मार्गक्रमण करू,असे राधाकृष्ण महाराज म्हणाले. आज राजेश बियाणी, ऐडवोकेट रविन्द्र भागवत, गिरधारी लाल शर्मा, नीरज शर्मा, निशिकान्त जखोटिया यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले. संचालन अनूप गांधी यानी केले.
God is attracted by nature,
the world is fascinated by wealth,
the fifth day of the Bhagavata story