शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाकरीता पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य Alternative documents admissible as evidence for teacher constituency voting

शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाकरीता पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 23 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीकरीता सोमवार, दि. 30 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्यातील 27 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणूकीत मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त नमूद पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने आदेश दिले आहे.

मतदारांची ओळख पटविण्यासाठी पर्यायी नमूद कागदपत्रे:
आधारकार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र,राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेल्या फोटोसह सेवा ओळखपत्र, खासदार-आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, संबंधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम,नोकरी करीत आहेत त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित मूळ पदवी-पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र तसेच भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरित केलेले युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहे. या संदर्भात संबंधित मतदारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी कळविले आहे.

Alternative documents admissible as evidence for teacher constituency voting.