भूकंप सदृश स्थितीचा वैज्ञानिक तपासणी अहवाल प्राप्त झाल्या शिवाय वेकोलीने ब्लास्टिंग करु नये - आ. किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेत केल्या सुचना Blasting should not be carried out by wcl without receiving the scientific investigation report of earthquake-like condition - After meeting mla Kishore Jorgewar, Collector Vinay Gowda, instructions were given

भूकंप सदृश स्थितीचा वैज्ञानिक तपासणी अहवाल प्राप्त झाल्या शिवाय वेकोलीने ब्लास्टिंग करु नये - आ. किशोर जोरगेवार

जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेत केल्या सुचना

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: चंद्रपुर शहरातील लालपेठ, बाबुपेठ, नांदगाव पेठ येथे सदृश भुकंपाचे झटके जाणविल्याचा प्रकार सलग दोन दिवस घडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घडलेल्या या प्रकाराची वै़ज्ञानिक तपासणी करुन सदर तपासणीचा अहवाल येई प्रयत्न सदर भागात वेकोली प्रशासनाला ब्लास्टिंग करण्यात सक्त मनाई करण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केल्या आहे.

आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेत शहरातील विकास कामांच्या विषयांवर चर्चा केली. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी सध्या चंद्रपूरात चर्चीला जात असलेल्या सदृश भुकंपाच्या प्रकाराबाबत संपुर्ण माहिती घेत सदर सुचना केल्या. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय जयस्वाल, यंग चांदा ब्रिगेडचे पंकज गुप्ता, श्रीकांत रेशीमवले आदींची उपस्थिती होती.

चंद्रपूर येथील भूमिगत कोळसा खाण परिसरात प्रामुख्याने बाबूपेठ, लालपेठ व नांदगाव पेठ या भागात रविवारी रात्रो साडे नऊ वाजताच्या दरम्यान अचानक धरणीकंप होत असल्याची जाणीव येथील स्थानिक नागरिकांना झाली. अनेकांच्या घरातील भांडी अचाणक हलु लागल्याने नागरिक भयभित झाले. अश्या प्रकारची भूकंप सदृश परिस्थिती उद्भवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच दुसऱ्या दिवशी सोमवार सायंकाळी ५ ते ५.२० वाजताच्या दरम्यान लालपेठ ओपनकास्ट खाण जवळील परिसरातील वस्त्यांमध्ये पुन्हा एकदा भूकंप सदृश्य झटके जाणवून घरे हादल्याचे निदर्शनास आले आहे. हे भुकंपाचे झटके नसल्याचे तज्ञांकडून बोलल्या जात असले तरी या मागचे मुळ कारण तात्काळ शोधणे गरजेचे आहे.

चंद्रपुरमध्ये भूमिगत कोळसा खाण असल्याने अधिक तीव्रतेच्या रिक्टर स्केल भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तात्काळ भुगर्भातील हालचालीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असुन चंद्रपूर येथील नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने भूकंप सदृश्य परिस्थिती बाबत वैज्ञानिक तपासणी करून याबाबत सविस्तर चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, सदर चौकशी अहवाल प्राप्त होई प्रयत्न वेकोलिची ब्लास्टिंग करून कोळसा उत्खनन प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्यांना निर्देशित करण्यात यावे अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केल्या आहेत.

 Blasting should not be carried out by wcl without receiving the scientific investigation report of earthquake-like condition - After meeting mla Kishore Jorgewar, Collector Vinay Gowda, instructions were given