माहेश्वरी समाजाची नवीन जिल्हा कार्यकारणी घोषित, शिवनारायण सारडा यांची जिल्हाध्यक्ष तर अजय काबरा यांची सचिव पदी निवड Maheshwari Samaj's new district executive declared, Shivnarayan Sarda elected as district president and Ajay Kabra as secretary

माहेश्वरी समाजाची नवीन जिल्हा कार्यकारणी घोषित

शिवनारायण सारडा यांची जिल्हाध्यक्ष तर अजय काबरा यांची सचिव पदी निवड

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: चंद्रपुर माहेश्वरी समाजाची नवीन जिल्हा कार्यकारणी निवडणूकीच्या माध्यमातून घोषित करण्यात आली असुन शिवनारायण नरसिंगदास सारडा यांची समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणुन तर अजय काबरा यांची सचिव म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 15 जानेवारी ला महेश भवन येथे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.

यावेळी माहेश्वरी समाजाचे विदर्भ समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष सि.ए. दामोदर सारडा, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुशिल मुंदडा, समाजाचे तालुका सचिव उमेश चांडक, माहेश्वरी सेवा समितीचे सचिव सुरेश सारडा, गोविंद राठी, मनिष बजाज, भरत बजाज, श्रिकांत भट्टड, दिपक सोमानी, शक्ती धुत, ऋषिकांत जाखोटिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माहेश्वरी समाजाची जुनी कार्यकारणीचा तिन वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. यासाठी तुकुम येथील महेश भवन येथे सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणूक प्रक्रियेला प्रभाकर मंत्री हे निवडणूक अधिकारी म्हणून तर सह निवडणुक अधिकारी म्हणून राजेश काकानी यांनी काम पाहिले तर निरीक्षक म्हणून गडचिरोलीचे दिलीप जाजु हे लाभले होते. यावेळी नवे जिल्हाध्यक्ष म्हणून शिवनारायण सारडा, सचिव अजय काबरा, उपाध्यक्ष गोपाल झंवर, जगदीश मुंदडा, कोषाध्यक्ष दिलीप राठी, सह कोषाध्यक्ष हरिष सारडा, प्रचार मंत्री ललित कासट, महासभा प्रतिनिधी डॉ. सुशील मुंदडा, प्रदेश प्रतिनिधी सि.ए. दामोदर सारडा, दिनेश बजाज, विनोद मनियार, उमेश चांडक, सदस्य म्हणून सुरेश सारडा, महेश दरक, अजय भट्टड, श्रिकांत मुंदडा, अभिषेक जाजू, सुरेश राठी, अनिल राठी, अरुन भट्टड, प्रभाकर मंत्री, राजेश काकानी, गोविंद राठी, पंकज सारडा, भरज बजाज, सुनिल भट्टड, सुधिर बजाज, पियुश माहेश्वरी, प्रविण सारडा, राजेंद्र मालु, मनिष शो बजाज, गिरीश मुंदडा, अॅड. आशिष मुंदडा, सी.ए. पंकज मुंदडा, आनंद झंवर, विनोद मेहता, श्री नितेश चांडक यांची निवड करण्यात आली आहे. तर विशेष निमंत्रित सदस्या म्हणून आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडीया, अशोक कुमार भैया, डॉ. जुगल किशोर सोमानी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शिवनारायण सारडा यांनी समाजाचे प्रश्न सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Maheshwari Samaj's new district executive declared, Shivnarayan Sarda elected as district president and Ajay Kabra as secretary