महापालिका क्षेत्रातील मनोरंजन कराबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली ही मोठी घोषणा Cultural affairs minister Sudhir Mungantiwar made this big announcement regarding entertainment tax in municipal sector

महापालिका क्षेत्रातील मनोरंजन कराबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली ही मोठी घोषणा

#Loktantrakiawaaz
पुणे : सांस्कृतिक कार्य विभागाच्या (Department of Culture) वतीने सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट, साहित्य या क्षेत्रात पुढं जाण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी चित्रपट पाहावे, यासाठी महापालिका क्षेत्रातील मनोरंजन कर (Entertainment Tax) बंद करण्याचा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र सरकार ओटीटी प्लॅटफार्म, पोर्टल तयार करत आहे. चित्रपट क्षेत्राला समोर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली. मुकंदराज थिएटर अकॅदमीत आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुनगंटीवार बोलत होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वरिष्ठ निर्देशक जानू वर्मा, अभिनेत्री विद्या बालन, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष जब्बार पटेल, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते. मुंबई आणि कोल्हापुरात अत्याधुनिक चित्रपट सृ्ष्टी करण्याचा प्रयत्न असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
देशात चित्रपट इंडस्ट्रीने प्रगती केली आहे. जगातील चांगले चित्रपट देशात तयार होत आहेत. आमच्या चित्रपटांचे अनुकरण दुसऱ्यांनी केले पाहिजे. पर्यावरणाचा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी काम सुरू आहे. येणाऱ्या काळात पुरस्काराची रक्कम वाढवली जाण्यावर सरकार विचार करेल. सांस्कृतिक क्षेत्रात शक्ती, ऊर्जा, उत्साह देण्याचे काम सुरू आहे. यात राज्याने जगात आपली ओळख पोहचविली आहे, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील म्हणाले, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. सर्व प्रकारच्या कला येथे सादर होत असतात. मुंबई हिंदी चित्रपटांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. तसेच पुणे मराठी चित्रपटांची जन्मभूमी आहे. कोल्हापूरसारखं पुण्यात चित्रपट तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. या चित्रपट सृष्टीतून काही चांगले चित्रपट तयार केले जातील.

Cultural affairs minister Sudhir Mungantiwar made this big announcement regarding entertainment tax in municipal sector