चंद्रपुर मनपा व १७ नगरपरिषदांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन Organization of sports and cultural festival for officers and employees of Chandrapur Municipal Corporation and 17 municipal councils

🏆 चंद्रपुर मनपा व १७ नगरपरिषदांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन

🏆चंद्रपुर जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन

🏆 चंद्रपूर मनपा व १७ नगरपरिषदांच्या ५०० हुन अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग  

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर २२ फेब्रुवारी - महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन  दि.२४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान सैनिकी शाळा विसापूर येथे करण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नगर परीषद व महानगरपालिका यांचा सहभाग असणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांप्रमाणे नगर विकास विभाग अंतर्गत येत असलेले कर्मचारी नागरीकांना सोयी सुविधा पुरविण्यास कठीण परिश्रम करतात. कार्यालयीन कामांमुळे अनेकदा स्वतःच्या मानसिक व शारीरिक स्वाथ्याकडे दुर्लक्ष होते. कर्मचाऱ्यांना नियमित कामातून थोडा‎ दिलासा मिळावा, संघटित भावना व खेळ भावना वाढीस लागावी या उद्देशाने‎ सदर कला व क्रीडा‎ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यात  मैदानी‎ स्पर्धांमध्ये सांघिक प्रकारात व्हाॅलिबाॅल, क्रिकेट, टग ऑफ वॉर,‎ ४०० मीटर रिले रेस वैयक्तिक खेळात १०० मीटर रनिंग या साेबत‎ इनडोअर गेम चेस,कॅरम, बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात येणार आहेत.‎  

नगर विकास विभागाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अश्या महोत्सवाचे आयोजन प्रथमतःच होत असुन यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, वरोरा, भद्रावती, चिमुर, घुग्गुस, ब्रम्हपुरी, जिवती, सिंदेवाही,गडचांदूर, सावली, कोरपना, नागभीड, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, मुल, भिसी, बल्लारपूर या १७ नगरपरिषद व चंद्रपूर महानगरपालिका सहभागी होणार आहे. सर्व क्रीडा स्पर्धा या दिवसा तर सांस्कृतीक स्पर्धा संध्याकाळी घेण्यात येणार आहे. सर्व नगर परिषद कार्यालयांच्या सहभागातुन स्पर्धा होणार असुन नगर परिषद बल्लारपूर कार्यान्वीत यंत्रणा म्हणुन काम बघणार आहे. स्पर्धकांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था चंद्रपूर येथे करण्यात आली आहे.

महोत्सवाचे उदघाटन मा. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २४ फेब्रुवारी रोजी ४ वाजता विसापुर येथील सैनिकी शाळेत होणार असुन स्पर्धेच्या नियोजनाकरीता मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली व  सर्व मुख्याधिकारी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात नियोजन समिती, स्वागत समारोह व समारोप समिती,माहीती व प्रसिद्धी समिती, वैद्यकीय समिती, तक्रार निवारण समिती, क्रीडा समिती, सांस्कृतीक समिती, भोजन व निवास व्यवस्था, बक्षीस वितरण समिती, खरेदी व खर्च व्यवस्थापन समिती अश्या ११ प्रकारच्या समितींचे गठन करण्यात आले आहे.

Organization of sports and cultural festival for officers and employees of Chandrapur Municipal Corporation and 17 municipal councils