#Loktantrakiawaaz
चंद्रपू, दि. 15 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून 15 ते 19 मार्च या कालावधीत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या कालावधीत जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Chance of rain in Chandrapur district from March 15 to 19