जयश्री लॉन येथील टाटा मोबाईल टॉवरला सील, कर विभागाची सातत्याने कारवाई, सुटीच्या दिवशीही जप्ती पथके कार्यरत cmc chandrapur Tata mobile tower at Jayashree lawn sealed, tax department's continuous action, confiscation teams working even on holidays

❇️ जयश्री लॉन येथील टाटा मोबाईल टॉवरला सील

❇️ कर विभागाची सातत्याने कारवाई

❇️ सुटीच्या दिवशीही जप्ती पथके कार्यरत

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर ५ मार्च -  मोठी थकबाकी असणाऱ्या चंद्रपुर जयश्री लॉन येथील टाटा मोबाईल टॉवरला चंद्रपुर शहर महानगर पालिका कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे त्याचप्रमाणे बाबुपेठ येथील मोरेश्वर मोहुर्ले यांचे दुकानही सील करण्यात आले असुन मालमत्ता कर वेळेत न भरणाऱ्या मालमत्ता धारकांची मालमत्ता सील करण्यात येत आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १२ पथके गठीत करण्यात आली असुन सदर पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत आहेत वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे.
कर विभागातर्फे अनेक गाळ्यांवर कारवाई प्रस्तावीत आहे. जप्ती पथक जाताच यातील अनेक गाळेधारकांद्वारे कराचा पुर्ण भरणा केला जातो जसे गणराज ट्रॅव्हल्स, मुत्थुट फायनान्स, बोराडे कॅटरर्स, शौर्य ज्वेलर्स, अरिहंत फर्निचर, हनुमान वॉर्ड येथील अभय चुंचावर, पठाणपुरा येथील बापू भांदककार, बालाजी वॉर्ड येथील लक्ष्मीचंद हरियानी, गणपत भगत, तुकाराम वानखेडे, बाजार वॉर्ड येथील कोहूमल मल, सोनू दुधानी, अंबादासजी बुरडकर सॉ मिल, बाबुपेठ येथील पुंडलिक पायघन, कोतवाली वॉर्ड येथील अशोक कारवा, सिटी शाळा, बंगाली कॅम्प येथील सुरज शर्मा, बंगाली कॅम्प येथील सुजाता बिश्वास  या सर्व मालमत्ता धारकांनी कर वसुली व जप्ती पथक पोहोचताच सकारात्मक प्रतिसाद देत कराचा पूर्ण भरणा केला आहे.

अनेक मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येणार आहे. 

सदर कारवाई ५ मार्च रोजी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त विद्या पाटील, नरेंद्र बोभाटे, सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, कर विभाग प्रमुख अनिल घुले, अग्निशमन विभाग प्रमुख चैतन्य चोरे, पथक प्रमुख नागेश नित, नरेंद्र पवार, अमित फुलझेले, चिन्मय देशपांडे, अमुल भुते, प्रगती भुरे, अतुल भसारकर, रवींद्र कळंबे, सोनू थुल, प्रतीक्षा जनबंधु, अतुल टिकले, सागर सिडाम, विकास दानव, चॅनल वाकडे, प्रविण हजारे यांनी केली.

Tata mobile tower at Jayashree lawn sealed, 
Tax department's continuous action,

confiscation teams working even on holidays