उत्साहपूर्ण वातावरणात अयोध्येच्या मंदिराकरीता जाणा-या काष्ठाचे पुजन, शोभायात्रेने दुमदुमली बल्लारपूर नगरी In an enthusiastic atmosphere, the city of Ballarpur was filled with processions and processions to the temple of Ayodhya.

🛕 उत्साहपूर्ण वातावरणात अयोध्येच्या मंदिराकरीता जाणा-या काष्ठाचे पुजन

🚩 शोभायात्रेने दुमदुमली बल्लारपूर नगरी

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 29 मार्च : चंद्रपूर – गडचिरोलीच्या दंडकारण्यातील उच्च प्रतीचे काष्ठ अयोध्येतील राममंदिरासाठी पाठविले जात आहे. यानिमित्ताने बल्लारपूर येथे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते काष्ठाचे पुजन करण्यात आले. यावेळी उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या शोभायात्रेने बल्लारपूर नगरी दुमदुमली. 
काष्ठ असलेल्या रथावर पालकमंत्र्यांसह रामायणमध्ये प्रभु रामचंद्राची भुमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल, माता सितेची भुमिका करणा-या प्रसिध्द अभिनेत्री व माजी खासदार दिपीका आणि लक्ष्मणची भुमिका करणारे सुनील लाहेरी यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सपना मुनगंटीवार, माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, राहुल पुगलिया यांच्यासह वाल्मिकी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवर म्हणाले की, अयोध्येतील प्रभु रामचंद्राच्या भव्य मंदिराकरीता गडचिरोली – चंद्रपूर येथील काष्ठ निवडण्यात आले आहे. हे आमचे सर्वांचे सौभाग्य आहे. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे उच्च तथा तांत्रिक शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, वन, पर्यावरण व जंतु उद्यान राज्यमंत्री डॉ. अरुण कुमार तसेच राज्यमंत्री रविंद्र जयस्वाल उपस्थित होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. 
शोभायात्रेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच विविध झॉकी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
In an enthusiastic atmosphere, 

The city of Ballarpur was filled with processions and processions to the temple of Ayodhya.