चंद्रपुर जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु, अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण Resident Police Constable Recruitment Pre-Examination Training for Candidates from Muslim, Christian, Buddhist, Sikh, Parsi, Jain and Jewish, Minority Community in Chandrapur District

▪️चंद्रपुर जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु 

▪️अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण

▪️29 मार्च रोजी पोलिस ग्राउंड येथे उपस्थित राहून अर्ज सादर करण्याचे आवाहन

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 27 मार्च : अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये समान संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने शासनाद्वारे प्रशिक्षण कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासंदर्भात निवासी पोलिस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत सन 2022-23 करीता चंद्रपुर जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्यांक समाजातील इच्छुक उमेदवारांना पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्याकरीता सदर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

उमेदवारांनी दि. 29 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्हा मुख्यालयातील पोलीस ग्राउंड, चंद्रपूर येथे उपस्थित राहून अर्ज सादर करावेत.

प्रशिक्षणार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. (तहसीलदार, नायब तहसीलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्रानुसार), उमेदवार हा अल्पसंख्यांक समाजातील असावा. उमेदवार 18 ते 45 वर्षे वयोगटातील असावा. उमेदवाराची उंची पुरुष 165 सेमी व महिला 155 सेमी असावी. तर छाती (पुरुष) 79 सेमी (फुगवून 84 सेमी) असावी. उमेदवार इयत्ता बारावी पास असावा. उमेदवाराने रहिवासी दाखला ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक आहे. 

निवडलेल्या उमेदवारांपैकी किमान 70 उमेदवार मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील, 20 उमेदवार बौद्ध समाजातील, चार उमेदवार ख्रिश्चन, चार उमेदवार जैन, आणि प्रत्येकी एक उमेदवार शीख व पारशी समाजामधून निवडण्यात येईल. 

ख्रिश्चन, जैन, शीख आणि पारसी समाजामधून उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर अल्पसंख्यांक समाजामधील उमेदवार निवडण्यात येईल.

या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा राहील. तरी, चंद्रपुर जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईबाबा बहुउद्देशिय शिक्षण संस्था, पिटीगुडा-1 अल्पसंख्याक निवासी पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण जिवतीचे अध्यक्ष यांनी केले आहे.

Resident Police Constable Recruitment Pre-Examination Training for Candidates from Muslim, Christian, Buddhist, Sikh, Parsi, Jain and Jewish, Minority Community in Chandrapur District