येत्या पावसाळी अधिवेशनात सुधारणा विधेयक ठेवण्याचे मंत्रीमहोदयांचे आश्वासन
चंद्रपूर : चंद्रपूर शहर परकोटामध्ये वसलेलं शहर आहे. परकोटाच्या १०० मीटर नंतर बांधकामाची परवानगी मिळत असल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिक वंचित राहत आहेत. त्यामुळे हि अट रद्द करून १०० वरून ९ मिटर करण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.
संपूर्ण भारतात ३६९६ मध्यवर्ती संरक्षित स्मारके (Centrally Protected Monuments) पुरातत्व विभागाकडे असून चंद्रपूर शहरातील परकोट, ४ प्रवेशद्वार, ५ छोटे द्वार (खिडकी) याचा देखील मध्यवर्ती संरक्षित स्मारकात (CPM) समावेश आहे.चार वर्षांपूर्वी ९ मीटर्सच्या बाहेर मनपा तर्फे बांधकामाची परवानगी मिळात होती. मात्र गत चार वर्षांपासून ९ मीटर्सच्या ऐवजी १०० मीटर्स च्या बाहेर बांधकाम परवानगीची मर्यादा वाढविल्यामुळे चंद्रपूर शहरातील हजारो भूखंड धारक व लगतच्या इमारती अडचणीत आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री किसनजी रेड्डी यांचेकडे पत्राचार करून यावर उपाययोजना करून तोडगा काढण्याची व पूर्ववत हि मर्यादा ९ मीटर्स पर्यंत आणण्याची आग्रही भूमिका घेतली होती. त्यानुसार मंत्री महोदयांनी त्यांचे सचिव आशुतोष सलील यांना सूचना देऊन दिल्ली येथे आज बैठकीचे आयोजन केले होते.
त्यानुसार खासदार बाळू धानोरकर व पर्यटन मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आशुतोष सलील यांची दिल्ली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. संपूर्ण भारतातील ३६९६ स्मारकांमध्ये वेगवेगळे वर्गीकरण करून घनदाट वस्ती, विरळ वस्ती, ग्रामीण भाग, अतिक्रमितांच्या वास्तू या प्रमाणे निकष लावून येत्या पावसाळी अधिवेशनात बिल मांडून सुधारणा करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. यामुळे चंद्रपूर शहराच्या परकोटमुळे संकटात पडलेल्या नागरिकांना मोठाच दिलासा मिळणार आहे.
Permission for construction 9 meters above the perkota of Chandrapur city soon: MP Balu Dhanorkar,
Minister's promise to put an amendment bill in the coming monsoon session