पावसाळ्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार, नागरिक व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन All gates of Chichdoh Barrage project in Gadchiroli district will be opened before monsoon, citizens and villagers are urged to be vigilant

पावसाळ्यापूर्वी चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार

नागरिक व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 12 में : यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2023 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून नदीलगतची सर्व गावे व ग्रामपंचायतींनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरुनी नदीवर आंघोळ करतांना, मासेमारी करणारे, नदी घाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणारे, बॅरेज परिसरातील गावकऱ्यांनी व नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क रहावे,असे आवाहन लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर, चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जुन 2018 मध्येच पूर्ण झाले असून सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरचे बाजूस 4 किलोमीटर वर आहे. बॅरेजची एकूण लांबी 691 मीटर असून 15 मीटर लांब × 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी  उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहे. दि. 15 ऑक्टोबर 2022 पासून संपूर्ण दरवाजे बंद करण्यात आले होते.

चिचडोह बॅरेजच्या बुडीत क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधित होणाऱ्या व नदीकाठावरील गावे:

चिचडोह बॅरेजच्या बुडीत क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधित होणाऱ्या व नदी काठावरील गावांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, चामोर्शी तालुक्यातील कुरुड ग्रामपंचायत अंतर्गत कुरुड व रामपूर, विसापूर ग्रामपंचायतीअंतर्गत विसापूर, निमगाव, खोर्दा व हिवरगांव तसेच तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगाव (रै), आमगाव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगांव, फराडा, दोटकुली तर गडचिरोली तालुक्यातील डोंगरगाव(बु.), शिवणी, मुडझा(बु.) व पुलखल आदी गावे तर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याअंतर्गत हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेडगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेंगाव, कापसी व उपरी आदी गावांचा समावेश आहे.

All gates of Chichdoh Barrage project in Gadchiroli district will be opened before monsoon, 

Citizens and villagers are urged to be vigilant