जलसाठे पुनरुज्जीवन मोहिमेची चंद्रपूर जिल्हात जनजागृती
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर: भारतीय जैन संघटनेच्या वतीने चंद्रपुर जिल्ह्यातील गावामध्ये जलसाठे पुनरुज्जीवन मोहिम राबविण्यात येणार असून, आज मंगलवार 16 मे रोजी चंद्रपूर येथे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी भारतीय जैन संघटनेच्या प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखविली.
चंद्रपुर जिल्ह्यातील गावामध्ये तलाव, पाझर तलाव, मामा तलाव, गाव तलावातील गाळ काढून स्थानिक शेतकऱ्यांचा सहकार्याने गाळ काढून शेतात टाकण्याकरिता घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदर उपक्रमामुळे जलसाठ्याचे खोलीकरण होऊन पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.तसेच शेतकऱ्याचा शेतीचा कस वाढणार आहे. सदर योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्हात श्री आनंद नागरी बँक परिवार यांच्या सौजन्याने प्रचाररथ काढण्यात आला असून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गोंडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
यावेळी चंद्रपुर मनपा आयुक्त विपिन पालीवार, उपजिल्हाधिकारी रोहयो पल्लवी घाटगे, जिल्हा जलसंधारण अधिकारी- मृद व जलसंधारण विभाग आर आर बहूरिया, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी गिरीष कालकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी लपा कु. प्रियंका रायपुरे, जलसंधारण अधिकारी सारंग धकाते तसेच महेंद्र मंडलेचा, दीपक पारख, गौतम कोठारी, अभिषेक कास्टीया, द्विपेंद्रजी पारख, अनिकेत लुनावत, दिक्षांतजी बेले उपस्थित होते.
Collector flagged off Bharatiya Jain Sanghatna (BJS) campaign chariot, water reservoir revival campaign in Chandrapur District