काँग्रेसचे नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार, राजकीय वर्तुळात खळबळ Congress leader, Chandrapur District Central Co-operative Bank President Santosh Rawat fired, Excitement in political circles

💥 काँग्रेसचे नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार 

💥 राजकीय वर्तुळात खळबळ

चंद्रपुर: मूल येथील काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर आज अज्ञात इस्मानी गोळी झाडली. या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही इजा झाली नसली तरी त्यांच्या हाताला घासून गोळी गेली.

याप्रकरणी मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून, संतोष रावत यांना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करिता नेण्यात आले आहे.

आज सायंकाळच्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूल शाखेच्या परिसरात ही घटना घडली.
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत हे मूल येथील शाखेत आपल्या कार्यकर्त्यासह बसुन होते, दरम्यान रात्रौ 9.30 वाजता घराकडे जाण्यासाठी निघाले असता, एका स्विप्ट कार मधुन बुरखाधारी इसमाने त्यांच्यावर गोळीबार केले, यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी कार पकडण्याचा प्रयत्न केला मात्र कार घेवुन पळुन जाण्यास ते यशस्वी झाले. संतोष रावत यांच्यावर गोळीबार करण्यामागचे नेमके कारण अजुन तरी गुलदस्तात आहे. सदर घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गोळीबार करणारा अज्ञात असून तो फरार आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

संतोष रावत यांच्यावर गोळीबार का करण्यात आला? कोणत्या हेतूने करण्यात आला? कोणी केला? की हा गोळीबार कुणी घडवून आणला? या प्रश्नाचे उत्तरे मात्र अनुत्तरीत आहे
मूल शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Congress leader, Chandrapur District Central Co-operative Bank President Santosh Rawat fired

💥 Excitement in political circles