व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुरेश डांगे यांची निवड Selection of Suresh Dange as District Working President of Voice of Media Weekly Department

व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुरेश डांगे यांची निवड

चंद्रपूर / प्रतिनिधी- पत्रकारांची देशपातळीवर काम करणारी संघटना व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर साप्ताहिक पुरोगामी संदेशचे संपादक सुरेश डांगे यांची निवड करण्यात आली आहे.

सुरेश डांगे यांची निवड व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांच्या अनुमतीने साप्ताहिक विभागाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड यांनी केली आहे.

सुरेश डांगे यांनी सन १९९३ मध्ये हिंदी दैनिक देश प्रतिष्ठा मध्ये ऑफीस बॉय, कम्पोझिटर व कार्यालय प्रतिनिधी म्हणुन पत्रकारीतेला प्रारंभ केला. त्यानंतर नवराष्ट्र, नवभारत, देशोन्नती, हितवाद व अन्य साप्ताहिक वृत्तपत्रात तालुका प्रतिनिधी म्हणुन काम केले आहे. विविध विभागीय वृत्तपत्रात त्यांचे सामाजिक परिवर्तन, समाजवादी व कामगार विषयावर अनेक लेख प्रकाशित होत असतात. १३ मे २०१३ पासुन त्यांनी साप्ताहिक पुरोगामी संदेश सुरु करुन त्यात ते पुर्णवेळ काम करीत आहेत. पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेवुन त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनाचे अधिस्विकृती धारक पत्रकार म्हणुन कार्यरत असणारे सुरेश डांगे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.

व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड (संपादक लोकतंत्र की आवाज) यांनी घोषीत केलेल्या व्हाईस ऑफ मिडीयाच्या जिल्हा कार्यकारणीत जिल्हा कार्याध्यक्ष पदावर सुरेश डांगे (साप्ताहिक पुरोगामी संदेश) व अरुण वासलवार (संपादक स्वराज्याचा अरुणोदय), जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र बोकारे (संपादक सर्व देशबांधव) व प्रा. शामराव करंबे (संपादक ब्रम्हनगरी), जिल्हा सरचिटणीस विनोद बोदले (कार्यकारी संपादक पॉवरसिटी) व विठ्ठल आवळे (संपादक चंद्रपूर सप्तरंग), जिल्हा कोषाध्यक्ष नरेश निकुरे (संपादक प्रेझ टु महाराष्ट्र), जिल्हा कार्यवाहक गणेश रहिकवार (संपादक चंडीका एक्सप्रेस), जिल्हा संघटक मनोहर दोतपल्ली (संपादक राज्य रिपोटर), जिल्हा सहसंघटक आशिष घुमे (संपादक सहयाद्रीचा राखणदार) तर जिल्हा कार्यकारणी सदस्यांमध्ये अशोक कोसे (संपादक नागभीड सेवक), राम चिचपाले (संपादक लोक प्रतिष्ठा), सुयोग डांगे (संपादक पुरोगामी एकता) यांचा समावेश आहे.

Selection of Suresh Dange as District Working President of Voice of Media Weekly Department

#VOM  #Voice Of Media  #Media  #Journalism