⭕ जिल्हानिहाय आकडेवारी...
महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात 16 ते 25 वयोगटातील 3 हजार 594 मुली बेपत्ता झाल्या आहेत.
मुंबईः महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात 16 ते 25 वयोगटातील 3 हजार 594 मुली बेपत्ता झाल्या आहेत.महाराष्ट्र राज्य सरकारच्या वेबसाईटवर असलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक आहे, असे म्हणत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने हरवलेल्या मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी शक्य तितकी तत्परता दाखवावी, अशी विनंती रुपाली चाकणकर यांनी केली आहे. राज्य सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत नाहीत, मात्र या प्रकरणात ज्या तत्परतेने काम व्हायला हवे होते. पण ते होताना दिसत नाही, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान राज्यातील 3 हजार 594 महिला हरवल्या आहेत, यातील काहींचा शोध लागला असला तरी एकंदरीतच ही गंभीर बाब आहे. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल करुन त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचेही समोर आलं आहे. राजकारण सोडून राज्य सरकारने आधी मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावे. मुली बेपत्ता होण्याचा आकडा प्रचंड वाढत आहे, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
👉🏻 बेपत्ता युवतींची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणेः
▪️अहमदनगर 184,
▪️अकोला 41,
▪️अमरावती शहर 31,
▪️अमरावती ग्रामीण 63,
▪️औरंगाबाद शहर 66,
▪️औरंगाबाद ग्रामीण 52,
▪️ बीड 27,
▪️भंडार 23,
▪️मुंबई शहर 383,
▪️बुलढाणा 76,
▪️चंद्रपूर 101,
▪️धुळे 45,
▪️गडचिरोली 13,
▪️गोंदिया 46,
▪️हिंगोली 14,
▪️जळगाव 121,
▪️जालना 36,
▪️कोल्हापूर 127,
▪️लातूर 42,
▪️मीरा-भाईंदर 113,
▪️नागपूर शहर 108,
▪️नागपूर ग्रामीण 169,
▪️नांदेड 36,
▪️नंदुरबार 37,
▪️नाशिक शहर 93,
▪️नाशिक ग्रामीण 169,
▪️नवी मुंबई 75,
▪️उस्मानाबाद 34,
▪️पालघर 28,
▪️परभणी 27,
▪️पिंपरी चिंचवड 143,
▪️पुणे शहर 148
▪️पुणे ग्रामीण 156
अशी बेपत्ता तरुणींची संख्या आहे. या सर्व बेपत्ता तरुणी 16 ते 25 वयोगटातील आहेत.
Shocking! More than three thousand girls have gone missing from Maharashtra in the last three months, district wise statistics...