माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांच्या उपोषणाला चंद्रपूरकरांच्या पाठिंबा
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात सध्या अमृत योजनेअंतर्गत नवीन नळ जोडणी चे काम सुरु आहे. हे काम अद्याप पूर्णत्वास होण्याच्या अगोदरच कंत्राटी पद्धतीने पाणीपुरवठा योजना चालविण्याबाबत पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराच्या घशात घालून चंद्रपूरकरांचा घसा कोरडा करण्याचे पाप मनपा प्रशासन करीत आहे. असा आरोप करीत माजी नगरसेवक गोपाल अमृतकर या निर्णयाविरोधात आज दिनांक २२-६-२०२३ रोजी महानगर पालिका कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला चंद्रपूरकरांनी पाठिंबा दर्शविला आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा योजना कंत्राटदारामार्फत चालविण्यात आलेली होती. याचे अनुभव चंद्रपूरकरांना फार वाईट आलेले असून कित्येकदा पाण्याबाबत पालिकेवर मोर्चे आंदोलने काढल्या गेले. पालिकेने सुद्धा कित्येकदा कंत्राटदाराला समज देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत व शहरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत वरंवार ताकीद दिल्या या उपरातसुद्धा चार - चार दिवस नागरिकांना पाणी मिळत नव्हते. अखेरीस पालिकेतर्फे आमसभेत ठराव घेऊन कंत्राटदारांवर कारवाई करून कोर्टामध्ये खटला चालविण्यात आला होता. त्यानंतर पालिकेने पाणीपुरवठा चालविण्यासाठी स्वतःकडे घेतली होती.
हा जुना अनुभव लक्षात घेता पाण्यासारखी अत्यावश्यक सेवा हि कंत्राटदाराच्या घशात न घालता मनपाने स्वतःकडे ठेवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यात देखील तीव्र आंदोलन करण्यात असल्याचे माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांनी सांगितले.
Water supply scheme contractor's weed, Chandrapurkarancha's weed will not be cored, former corporator Gopal Amritkar's sub-consultant Chandrapurkaranchya support