असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूजपेपर ऑफ इंडिया च्या राज्य कार्यकारिणीची 23 रोजी परळी येथे बैठक State executive meeting of Association of Small and Medium Newspapers of India at Parli on 23rd

असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूजपेपर ऑफ इंडिया च्या राज्य कार्यकारिणीची 23 रोजी परळी येथे बैठक

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 22 जुलै : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दिनांक 23 जुलै 2023 रोजी राज्याचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता संपन्न होत असून या बैठकीत विविध विषयावर चर्चा करून ठराव संमत करण्यात येणार आहेत अशी माहिती बीड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण वाकडे यांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले की महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक परळी येथील वैद्यनाथ औद्योगिक सहकारी वसाहत सभागृह नाथ रोड परळी वैजनाथ येथे दिनांक 23 जुलै 2023 रोजी संपन्न होत असून या बैठकीत   

१.मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे.
२.अधीस्वीकृती समितीच्या पुणे विभागीय सदस्य पदी निवड झाल्याबद्दल राज्य उपाध्यक्ष गोरख तावरे यांचा सन्मान करणे.
३.शासनमान्य जाहिरात या दिवाळीत वृत्तपत्रांना सरसकट 100% जाहिरात दरवाढ मिळणे बाबत.
४.अधीस्वीकृती समितीत सदस्य म्हणून संघटनेच्या सभासदांना स्थान मिळणे बाबत. (त्याच त्या संघटनांना प्रतिनिधित्व देण्यापेक्षा राज्यात इतरही कार्यक्षम व वृत्तपत्रांच्या संबंधाने सकारात्मक कार्य करणाऱ्या संघटना आहेत त्यांचा विचार करून त्यांच्या प्रतिनिधींचाही अधीस्वीकृती समितीत सदस्य म्हणून समावेश करणे बाबत).
५.ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेबाबत राज्य शासनाने तात्काळ बैठक घेऊन जे पात्र आहेत त्यांना या योजनेत समावेश करून त्यांना आर्थिक मदत करणे बाबत.
६.शासनमान्य वृत्तपत्रांना नियमितपणे देण्यात येणाऱ्या जाहिरातीचा आकार ४०० चौरस ऐवजी १००० चौरस सेंटीमीटर करणे बाबत.
७.शासनमान्य जाहिरात यादीवरील लघु वृत्तपत्रांना जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती प्राधान्याने सुरू करणे बाबत.
८.विधान परिषदेवर पत्रकारांचा प्रतिनिधी घेणेबाबत.
९.म्हाडा योजनेतून पत्रकारांना प्राधान्याने  घर  मिळणे बाबत., 
१०.राज्य शासनाच्या वतीने वितरित  करण्यात येणाऱ्या दर्शनी जाहिराती कोणताही भेदभाव न करता सर्व वर्गातील वृत्तपत्रांना मिळणे बाबत.
११.राज्य शासनाने 2018 मध्ये जाहीर केलेल्या जाहिरात वितरण धोरणात बदल करून जाहिरातीच्या संख्येत वाढ करावी यात गुडी पाडवा, रमजान ईद, ख्रिसमस, डॉक्टर हेडगेवार जयंती,  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती आशा प्रसंगांचा समावेश करून जाहिराती वितरित कराव्यात अशी मागणी करणे बाबत., आधी विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे या बैठकीच्या पूर्वी "लघु व मध्यम वृत्तपत्र यांच्या समोरील आव्हाने " या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्राचे उद्घाटन दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी हे करणार आहेत या परिसंवादात मान्यवर वक्ते यांचा सहभाग असणार आहे. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत.  तरी या बैठकीस महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण वाकडे यांनी केले आहे.
State executive meeting of Association of Small and Medium Newspapers of India at Parli on 23rd